महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (MOA) निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या ऑलिम्पिक पॅनेलची घोषणा
मुंबई : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनेलचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या रविवारी होणाऱ्या एमओएच्या निवडणुकीत २१ उमेदवार अजित पवार गटाचे असून त्यापैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
मुंबईत २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ऑलिम्पिक पॅनलची घोषणा माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारीवाला यांनी केली आहे. मतदार ३१ संघटनांपैकी २५ पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – ना. अजित पवार,
वरिष्ठ उपाध्यक्ष – मा. अशोक पंडित,
उपाध्यक्ष – मा.आदिल सुमारीवाला- बिनविरोध निवड
उपाध्यक्ष – मा.प्रदिप गंधे, बिनविरोध निवड
उपाध्यक्ष – मा.प्रशांत देशपांडे, बिनविरोध निवड
सचिव – मा. नामदेव शिरगांवकर
सहसचिव – मा. चंद्रजीत जाधव
सहसचिव – मा. उदय डोंगरे
सहसचिव – मा. मनोज भोरे
सहसचिव – मा. निलेश जगताप
खजिनदार – मा. स्मिता शिरोळे
कार्यकारिणी सदस्य – संदिप चौधरी
कार्यकारिणी सदस्य – संदिप ओंबासे
कार्यकारिणी सदस्य – राजेंद्र निम्बाते
कार्यकारिणी सदस्य – गिरीश फडणीस
कार्यकारिणी सदस्य – रणधीरसिंग
कार्यकारिणी सदस्य – किरण चौगुले
कार्यकारिणी सदस्य – समीर मुणगेकर
कार्यकारिणी सदस्य – संजय वळवी
कार्यकारिणी सदस्य – सोपान कटके
ऑलिम्पिक पॅनेलचे
१७ पैकी अधिक संघटनेचे उमेदवार असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा विजय निश्चित असल्याचे माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारीवाला यांनी सांगितले आहे. आधीच उपाध्यक्ष पदासाठी मा.आदिल सुमारीवाला, मा.प्रदिप गंधे व मा.प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विजयी उमेदवार आंतराष्ट्रीय बॅडमिंटपपटू प्रदिप गंधे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. याचे सर्व श्रेय महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे आहे. अजित पवार यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे एमओएच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनासह देशातील पहिले क्रीडा संग्रहालय साकार होत आहे. यामुळेच निवडणुकीत अजित पवार गटाला संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
चौकट
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतील २५ पेक्षा अधिक संघटनांनी पुण्यातील बैठकीत उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. यावेळी पवार म्हणाले की, “खेळीमेळीत होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सज्ज झालो आहोत. बिनविरोध निवड झालेल्या तीनही उपाध्यक्षांचे मी मनापासून अभिनंदन करत आहे”.
पुण्यातील बैठकीत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतना उपमुख्यमंत्री अजीत पवार.
अधिक माहितीसाठी संपर्क- सहसचिव – मा. चंद्रजित जाधव

























