पाचोरा तालुक्यातील चिंचखेडा येथे दत्त जयंती आगळी वेगळी साजरी

पाचोरा तालुक्यातील चिंचखेडा येथे दत्त जयंती आगळी वेगळी साजरी

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील चिंचखेडा या गावांत नवनाथ मंदीरात दत्तात्रय जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

चिंचखेडा या गावी दत्तात्रय भगवान यांचा जन्मोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दुपारी जन्म होतांना पाळणा हलविण्यात आला यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, सुप्रिया सोमवंशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तर नवनाथ मंदीराची आरती विग्नहर्ता मल्टीस्पेशल चे संचालक डॉ भुषण मगर यांच्या हस्ते करण्यात आली. नवनाथांचे जागृत देवस्थान या ठिकाणी आहे. या चे मुख्य प्रवर्तक म्हणून प्रशांत ठाकरे हे काम बघतात. महाआरती निमित्ताने संपूर्ण गावाला महाप्रसाद केला जातो. यावेळी पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी, योगेश पाटील, किशोर रायसाकडा, अनिल येवले, दिलीप पाटील, सचिन पाटील, भुवनेश दुसाने, सुनील पाटील, विजय पाटील, एलआयसी विकास अधिकारी श्री वाघ, सरपंच सुनिल पाटील, अविनाश देशमुख, भैय्या देशमुख,राहुल शिंदे रवी पाथरवट, आदी उपस्थित होते*