आगामी पाचोरा नगरपालिका निवडणुक राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर लढणार व सर्व ३१ जागांवर उमेदवार देणार – तालुकाध्यक्ष विकास पाटील सर यांची माहिती

आगामी पाचोरा नगरपालिका निवडणुक राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर लढणार व सर्व ३१ जागांवर उमेदवार देणार – तालुकाध्यक्ष विकास पाटील सर यांची माहिती

कार्येकर्ते यांचा प्रचंड उत्साह बघुन घेतला निर्णय – लवकरचं माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रभागनिहायी जनसंवाद यात्रा सुरू करणार असल्याची दिली माहिती

*पाचोरा प्रतिनिधी : नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेल्या प्रमुख पदाधिकारी आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ व राष्ट्रवादी नेते संजय नाना वाघ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकित आगामी नगरपालिका निवडणुक’च्या बाबतीत आढावा व माहिती जाणुन घेतली असता – पाचोरा शहरातील सर्व प्रभागातील कार्येकर्ते यांच्यांशी चर्चा विनिमय केला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी स्वबळावर निवडणुक लढवावी* अशी *तीव्र इच्छा* सर्व उत्साही युवकसह इतर जेष्ठ कार्येकर्ते यांनी बोलुन व्यक्त केल्यामुळे *राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विकास पाटील सर यांनी आगामी पाचोरा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जागांवर उमेदवार देऊन स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस ने निवडणुक स्वबळावर लढवले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद व जागा या नक्कीच वाढणार आहे या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे चर्चा शहरात रंगत आहे.

लवकरच प्रभाग निहायी जनसंवाद यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार असुन – जनता व कार्येकर्तेंची संवाद करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचुन परीवर्तन करायच्या प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार असल्याचे माहिती तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी *पाचोरा राजकारण ग्रुप’ला यावेळी दिली आहे.

मित्रपक्ष शिवसेनेवर जास्तीतजास्त जागा मिळवण्यासाठी हा स्वबळाचा नारा राजकीय दबावतंत्र तर नाही ना ? यावेळी तालुकाध्यक्ष विकास पाटील यांना प्रश्न केला असता – त्यांनी *याविषयी स्पष्ट नकार यावेळी दिला आहे.कुठलेही राजकीय दबावतंत्र नसुन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार व सर्व ३१ जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस च्या स्वबळावर नारा’ दिल्यानंतर एकच खळबळ राजकीय वातावरणात निर्माण झाली आहे.तर विविध राजकीय खमंग चर्चा रंगल्या असुन भाजप व शिवसेनेसमोर कडवे आव्हाण निर्माण झाले आहे.राजकीय समीकरण व गणित आणि डावपेच बदलतील ? हि अपेक्षा तयार झाली आहे.