पाचोऱ्यात श्री भगवान महावीर जयंती मिरवणूक उत्साहात साजरी 

पाचोऱ्यात श्री भगवान महावीर जयंती मिरवणूक उत्साहात साजरी

पाचोरा प्रतिनिधी – अनिल आबा येवले पाचोरा येथील जैन समाजातर्फे दरवर्षी श्री भगवान महावीर जयंती उत्साह जैन सकल समाजातर्फे व जैन युवक मंडळातर्फे भव्य मिरवणूक गांधी चौकातील जैन मंदिर येथून श्री भगवान महावीर यांच्या पालखीचे मिरवणूक काढली जाते ही मिरवणूक गांधी चौक रथ गल्ली विठ्ठल मंदिर रोड जामनेर रोड श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रकाश टॉकीज देशमुख वाडी हिंद ऑइल मिल रोड मार्ग येथून जैन पाठशाळा येथे समारोप केला जातो श्री भगवान महावीर जयंती निमित्त जैन पाठ शाळेत विविध कार्यक्रम घेतले जातात परमपूज्य गुरु महाराज प्रदिपमुनिजी यांचे प्रवचन तसेच मुला मुलींचे विविध वेशभूषा करून जनजागृतीवर नाटक कार्यक्रम घेतले जातात तसेच या कार्यक्रमाला जैन समाजातील ज्येष्ठ नागरिक , जैन नवयुवक मंडल, तरुण वर्ग ,महिला वर्ग व बाल गोपाळ यात भाग् घेऊन आनंद व्यक्त करीत असतात तसेच यावेळी पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब पीएसआय श्री प्रकाश चव्हाण साहेब पोलीस कॉन्स्टेबल श्री प्रकाश पाटील श्री अशोक पाटील श्री गजानन काळे श्री सुनील पाटील श्री जितेंद्र बोरसे श्री विनोद बेलदार श्री योगेश पाटील श्री पवन पाटील इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले