डोकलखेडा येथे गुरांच्या लम्पी लसीकरणाला सुरवात

डोकलखेडा येथे गुरांच्या लम्पी लसीकरणाला सुरवात

नांद्रा(ता.पाचोरा)ता. 16 येथील जनावरांचे लंम्पी आजारावरील प्रतिबंधक असलेल्या 100 लसींचा टप्पा केला पुर्ण- ग्रामपंचायतींने केले शिबीराचे आयोजन डोकलखेडा ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने सरपंच व उपसरपंच आणी ग्रामसेवक सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पशु वैद्यकीय खाजगी डॉ.विजयसिंग पाटील (आसनखेडा) यांच्या सह शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.लंम्पी आजाराने महाराष्ट्र सह देशात थैमान घातलेले असतांना असंख्य जनावरे या आजाराने ग्रासले आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव वाढु नये व वेळीच उपाययोजना केले तर हे आटोक्यात येईल यासाठी शासनाने निर्देशीत केलेले मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामपंचायत डोकलखेडा कार्यालयाने पुढाकार घेऊन आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी गावातील- पशुपालन करणारे शेतकरी यांचे गाय, बैल, वासरू आणी गोरे यांना लंम्पी प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या.
या शिबीराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद शेतकरी यांचा मिळाला असुन १००लसी पाळीव जनावरांना देण्यात आल्या. यावेळी डोकलखेडा येथील सरपंच सौ.दिपाली पाटील व उपसरपंच सुनिल पाटील.ग्रामसेवक सुनिल रामा पाटील सर्व ग्रा.पं.सदस्य ग्रामपंचायत शिपाई शालिक पाटील सह आणी शेतकरी रामसिंग पाटील, शुभम पाटील उपस्थित होते.