किसान स्पोर्ट्स अकॕडमीतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न

किसान स्पोर्ट्स अकॕडमीतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न….!!!!!

भडगाव- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत *”किसान स्पोर्ट्स अकॕडमी,भडगाव”*,येथे स्व.मेजर ध्यानचंद यांच्या ११८ व्या जयंतीनिमीत्त राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमप्रसंगी आपल्या चपळ खेळाने जगभरात भारताचे क्रीडा विश्वात नाव अजरामर करणारे स्व.मेजर ध्यानचंद यांचे योगदान तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व उपस्थितांसमोर स्पष्ट केले.

त्यानंतर खेळाडूंनी स्केटींगची विविध कला दाखवून उपस्थितांची मने जिंकली,खेळाडूंच्या या कौशल्याचे उपस्थितांतर्फे कौतुक करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा जळगाव जिल्हा दुध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन अव्वर सचिव प्रशांतराव पाटील यांनी केले असून,सदर कार्यक्रमासाठी आदर्श क्रीडा शिक्षक सतीष पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी,स्केटींग प्रशिक्षक सुनिल मोरे,आतिक सातोटे आदि उपस्थित होते.