बांबरुड(राणीचे) येथील युवा शेतकरी मयुर वाघ यांना किसान प्रगती अवार्ड

बांबरुड(राणीचे) येथील युवा शेतकरी मयुर वाघ यांना किसान प्रगती अवार्ड

नांद्रा(ता.पाचोरा)ता.16 जगण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाहीआणि कष्टाशिवाय फळ नाही.येथील युवा शेतकरी मयुर वाघ यांनी आपल्या शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करून भरघोस पैसा कमावला त्यात पंपई, मोसंबी,आलं, फुलकोबी आणि सध्या त्यांची केळी ही सह्याद्री फार्म नाशिक या कंपनी मार्फत एक्सपोर्ट करून ती केळी इराकला जात आहे.त्यांना पुणे येथी उत्कृष्ट उद्योजक म्हणून किसान प्रगती अवॉर्ड देण्यात आला.
महाराष्ट्र,कर्नाटक,तामिळनाड, आंध्र प्रदेश ,तेलंगणा
या पाच राज्य मिळून
बांबरुड (राणीचे ) येथील छोट्या खेड्या गावातील शेतकऱ्यांला
पुणे येथे आउटग्रो व वेकूल कंपनीने पुरस्काराची संधी दिली. जळगाव जिल्ह्यातील
बांबरुड (राणीचे )युवा शेतकरी
मयूर अरुण वाघ ची निवड करण्यात आली होती.
वेकूल फूड्स आणि प्रॉडक्ट्स प्रा.ली आउटग्रो किसान प्रगती पुरस्कार साठी आधुनिक शेतीचा प्रयोग या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कृषी-उद्योजक म्हणून पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आला.फेयरफिल्ड मॕरिओट मुंढवा खराडी, पुणे येथील एका कार्यक्रमात देण्यात आला.