हिंदू गोर बंजारा समाज कुंभाला जाण्यासाठी आ.किशोरअप्पा पाटील यांचा कडून मोफत बस सेवा; बंजारा समाज बांधवांचा उत्साहात सहभाग
पाचोरा(वार्ताहर)दि,२८
संत सेवालाल महाराजांच्या नावाचा जयघोष करीत ‘चलो गोद्री चलो गोद्री’ असा नारा देत जामनेर तालुक्यात सुरू असलेल्या गोद्री येथील अखिल भारतीय धर्मसभेसाठी हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ २०२३ साठी पाचोरा व भडगाव मतदारसंघातील बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असून त्यांना या ऐतिहासिक कुंभाला जाता यावे व त्यांचा प्रवास सुकर होऊन सर्वांना एकत्रितपणे या धर्मसभेला उपस्थित राहुन साधू संतांचे आशीर्वाद घेऊन प्रवचन व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता यावे या उद्देशाने पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोरअप्पा पाटिल यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यात असलेल्या विविध तांड्यावस्त्यांमधून गोद्री येथे जाण्यासाठी सुमारे वीस एसटी बसेस सह काही खाजगी गाड्यांची व्यवस्था केली होती.या आरक्षित एस टी बसेस शनिवारी सकाळी आठ वाजता नेमून दिलेल्या गावांना पोहचून त्या संबंधित तांड्यातून बंजारा बांधवांना घेऊन मोठ्या उत्साहात गोद्री कुंभमेळ्यासाठी रवाना करण्यात आल्या.
यात पाचोरा व भडगाव तालुक्यातील हनुमानवाडी, विष्णूनगर, मोहाडी तांडा, वरसाडे , सातगाव डोंगरी , निंभोरी , पिंपळगाव , वडगाव आंबे एक व दोन नंबर तांडा, वडगाव जोगें, कोकडी,बदरखे, बाळद बुद्रुक,रूपनगर,वडगाव नालबंदी, पथराड तांडा आदी तांडे वस्तीवर राहणारे बंजारा बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झोले होते.
तांडा वस्ती सुधार योजनेत भरीव तरतूद करावी
बंजारा समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाची तांडा वस्ती सुधार योजना आहे. मात्र त्यावर भरीव तरतूद केली जात नाही.ग्रामविकास मंत्रालयाच्या
२५/१५ योजनेतून स्वतंत्रपणे दहा टक्के निधीची तरतूद करावी अशी मागणी आपण मंत्री ना. गिरीश महाजन यांचे कडे करणार आहोत.
आमदार किशोरआप्पा पाटील (पाचोरा-भडगांव विधानसभा)