पाचोरा:खेडगाव नंदीचे गावाजवळ मोटर सायकल स्वारास अज्ञात वाहनाची धडक एक जागीच ठार

पाचोरा:खेडगाव नंदीचे गावाजवळ मोटर सायकल स्वारास अज्ञात वाहनाची धडक एक जागीच ठार महामार्ग पोलिसांच्या हायवे मृत्युंजयदुत यांच्याकडून तात्काळ मदत!

आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी जळगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर खेडगाव नंदीचे गावालगत हॉटेल जय मल्हार पासून पुढे थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कुरंगी येथील रहिवाशी असलेले दुचाकी स्वारांना धडक दिली असता यामध्ये एक इसम जागीच ठार झाला असून दुसऱ्या विश्वास पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका चालक गोलू शिंदे यांच्या रुग्णवाहिकेमध्ये पाचोरा येथे पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी घटना घडताच पहाण येथे शेतकरी स्वप्निल नारायण महाजन हे प्रवास करीत असतांना निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ हायवे मृत्युंजय दूत राहुल महाजन यांना घटनास्थळी बोलून सदर मयत इसमास व त्याचबरोबर जखमी व्यक्तीला रस्त्यावरील प्रवाशांच्या मदतीने रुग्णवाहिका मध्ये टाकून पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती कुरंगी गावातील सरपंच यांना दूरध्वनी द्वारे कळविण्यात आली आहे.