श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील प्राणीशास्त्र विभागाकडून पक्षांकरिता food &water व सोबतच महाविद्यालयाच्या परिसरातील पक्षाची गणना हा उपक्रम

श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील प्राणीशास्त्र विभागाकडून पक्षांकरिता food &water व सोबतच महाविद्यालयाच्या परिसरातील पक्षाची गणना हा उपक्रम

 

पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील प्राणीशास्त्र विभागाकडून पक्षांकरिता food &water व सोबतच महाविद्यालयाच्या परिसरातील पक्षाची गणना हा उपक्रम ०१ मार्च 2023 रोजी पासून राबविण्यात आला या उपक्रमात करिता प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. प्रदीप लक्ष्मण रुद्रासवाड व प्रयोगशाळा सहाय्यक श्री एम पी जाधव आणि विद्यार्थी या सर्वांनी परिश्रम घेतले . पक्षांना पाणी पिण्याकरिता त्यांना मातीच्या भांड्यामध्ये पाणी आणि खाण्याकरिता धान्य हे महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये झाडावरती ठेवण्यात आले तसेच महाविद्यालयातील परिसरात मध्ये पक्षाची असलेली गणना करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने सुतार पक्षी , हरळ कवड्या गप्पी दास भारतीय नीलकंठ कोकिळा , पानकोंबडी घुबड, बुलबुल, भारतीय धनेश असे विविध प्रकारचे पक्षी आढळून आले या सर्व पक्षांचे दुर्बीण च्या सहाय्याने निरीक्षण करण्यात आले.हे पक्षी प्रामुख्याने येथे राहण्याचे कारण म्हणजे त्यांना भेटणारे अन्न आणि सुलभ वातावरण या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये उपलब्ध असल्यामुळे हे पक्षी इथे वास्तव्य करतात असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रा. प्रदीप रुद्रसवाड यांनी केले. या कार्यक्रमास साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष बी पाटील उपप्राचार्य डॉ .वासुदेवजी वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही पाटील,प्रा. एस टी सूर्यवंशी,प्रा.डॉ.माणिक पाटील,प्रा.शरद पाटील सर अदी उपस्थित होते.