श्री.गो.से.हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न

श्री.गो.से.हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कूल येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ , उपमुख्याध्यापक एन.आर. पाटील , पर्यवेक्षक आर.एल.पाटील ,.ए. बी.अहिरे , सौ.ए.आर. गोहिल , तांत्रिक विभाग प्रमुख .एस.एन.पाटील , किमान कौशल्य प्रमुख एम.बी.बाविस्कर , कार्यालय अधीक्षक .ए. बी.सिनकर, सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात आले.