श्री गो.से. हायस्कूल पाचोरा येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से. हायस्कूल पाचोरा येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 ते 13 ऑगस्ट तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये 30मीटर धावणे तीन पायाची शर्यत लिबू चमचा अशा विविध स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या यामध्ये वर्ग पाचवी ते सातवी या गटातील सुमारे 125 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाघाटन शाळेचे मुख्याध्यापिका सौ. प्रमिलाताई वाघ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक एन.आर. ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय क्रीडा प्रमुख एस पी करंदे सर उपशिक्षक एस बी मनोरे, सौ.एस व्ही साळुंखे मॅडम , रणजीत पाटील सर,सौ ज्योती ठाकरे सौ. वैशाली कुमावत , सौ.शितल महाजन,श्रीमती स्वाती वाघ,श्रीमतीसंगिता लासुरकर यांनी परिश्रम घेतले