एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज कोसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू

एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज कोसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू

दिनांक~०९/०६/२०२१
एरंडोल तालुक्यातील तळई येथील दोघांच्या अंगावर वीज कोसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.९ जुन रोजी घडली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे तळई येथे आज (दि ९ जुन) रोजी दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान शेतातील एका झाडाखाली आठ शेतकरी पाऊस सुरु झाल्याने थांबले असता यातील भुषण अनिल पाटील (वय १८) व विक्रम दौलत माळी ( चौधरी ) (वय ६०) यांच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन जन जखमी झाले आहेत.यात रमेश कौतिक धनगर ( वय ६५), संदिप वामन वाघ (वय २८) व यांचा मुलगा निवृत्ती धनगर, शांताराम धनगर, सुरेश पाटील, विजय नाईक, बाळा धनगर जखमी आहेत. त्यांचेवर तळई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्यांना घरी सोडण्यात आले आहे.