शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते कु.कृष्णा ठाकरे यांचा सत्कार

शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते कु.कृष्णा ठाकरे यांचा सत्कार…!

पाचोरा- पुणे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे संपन्न झालेल्या 17 वर्षाखालील राज्यस्तरीय आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्स सांघिक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून कु. कृष्णा ठाकरे याने जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.त्याच्या या दैदीप्यमान कामगिरीबद्दल शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्या सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.कु. कृष्णा ठाकरे हा निर्मल जिम्नॅस्टिक्स क्लबचा खेळाडू आहे.सातत्यपूर्ण सराव आणि श्री गणेश मोरे यांच्या अनमोल मार्गदर्शनाने त्याने उत्तुंग भरारी घेतली आहे.
निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात श्रद्धेय तात्यासाहेबांच्या प्रेरणास्थळाजवळ कुमार कृष्णाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे सचिव श्री.नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ.स्नेहल पाटील, मार्गदर्शक श्री. गणेश मोरे आदी उपस्थित होते.