राष्ट्रीय युवा संमेलनामध्ये कमलेश सोनवणे यांनी नोंदविली आपली उपस्थिती

राष्ट्रीय युवा संमेलनामध्ये कमलेश सोनवणे यांनी नोंदविली आपली उपस्थिती

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 30 जुलै रोजी मुंबईत रामकृष्ण मिशन द्वारा राष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातर्फे कमलेश सोनवणे यांनी उपस्थिती नोंदवली. यासाठी देशभरातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 200 युवक/युवतींनी सहभाग नोंदविला. तसेच स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीनुसार आपण जगात कुठेही गेलो तरी आपला देश आणि आपली संस्कृती यांवरील श्रद्धा तसूभरही ढळू देऊ नये असा विचारही त्यांनी मांडला. कमलेश सोनवणे हे पाचोरा तालुक्यातील असून विविध क्षेत्रांत कार्य करणारा युवा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.