जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा; माजी विद्यार्थी संघाची स्थापना
दत्तात्रय काटोले
सोयगाव : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (माजी कन्या शाळा) येथे शासन निर्णयानुसार आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यास गावकऱ्यांचा आणि माजी विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे, तसेच केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे, डस्टबिन्स, शैक्षणिक साहित्य अशा अनेक उपयुक्त भेटवस्तू देऊन शाळेच्या विकासाला हातभार लावला. ऍड. राजेश गिरी यांनी संगणक भेट दिला, तर अनिल मानकर, रविंद्र काळे, विष्णू मापारी यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आर्थिक मदत केली. कृषिभूषण अरुण सोहनी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन बक्षिसाची घोषणा केली.
शासन निर्णयानुसार माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. निर्णयाचे स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मंगला बोरसे मॅडम, मुख्याध्यापक किरण पाटील, रामचंद्र महाकाळ सर यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
नवीन माजी विद्यार्थी संघ
अध्यक्ष – रवींद्र पंडित काळे
उपाध्यक्ष – मंगेशभाऊ सोहनी
कार्याध्यक्ष – अनिल मानकर
सहकार्याध्यक्ष – बाबुशहा तुराबशहा
ज्येष्ठ सदस्यांमध्ये ऍड. राजेश गिरी, ऍड. योगेश पाटील, कृषिभूषण अरुण सोहनी, समाजसेवक बाळू बोरसे, दत्तात्रय काटोले, रवी काटोले आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाला गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, केंद्र प्रमुख फिरोज तडवी, ऍड. राजेश गिरी, नगरसेवक राजेंद्र दुतोडे, नगरसेवक हर्षल (बंटी) काळे, मंगेश सोहनी, विविध मान्यवर, तसेच मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक किरण पाटील सरांच्या शांत, सुयोजित आणि शिस्तबद्ध नेतृत्वामुळे संपूर्ण कार्यक्रम प्रभावीपणे पार पडला. जुन्या कन्या शाळेपासून आजच्या आधुनिक केंद्रीय शाळेपर्यंतच्या प्रवासाला उजाळा देत, माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेच्या विकासाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

























