श्री.गो. से. हायस्कूल पाचोरा येथे शालेय विद्यार्थी सुरक्षा संदर्भात पदाधिकाऱ्यांची भेट
पाचोरा( प्रतिनिधी ) दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी श्री. गो. से. हायस्कूल,पाचोरा येथे शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी शालेय विद्यार्थी सुरक्षा संदर्भात भेट दिली. विद्यार्थी सुरक्षेतेची पाहणी, संरक्षण भिंत, शाळेचे वाचमन यांच्याशी चर्चा, शुद्ध पाणी, शालेय पोषण आहार, स्वच्छतागृह,प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची चौकशी केली. विद्यार्थ्यांना शालेय शिस्त
सूचना देऊन शिस्तीचे काटेकोर पालन करण्याचे सूचना दिल्या. यावेळी मुख्याध्यापक एन. आर. पाटील. पर्यवेक्षिका अंजली गोहिल मॅडम, पर्यवेक्षक रहीम तडवी, ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग पाटील आर बी अजय सिनकर, रवींद्र बोरसे, संगीता वाघ उपस्थित होते.

























