विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त-आमदार किशोर पाटील

विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त-आमदार किशोर पाटील

 

 

 

 

 

पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

वार्ताहर गाळण बुद्रक तालुका पाचोरा -येथील पंचायत समिती शिक्षण विभाग व वसंतराव नाईक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा गाळण बु यांच्या संयुक्त विद्यमाने गाळण येथे तालुकास्तरीय 53 वे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.या प्रदर्शनाचे उदघाटन पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आश्रम शाळेचे अध्यक्ष बाबुलाल हरी राठोड होते.प्रमुख अतिथी म्हणुन तहसीलदार विजय बनसोडे, गट विकास अधिकारी सुधाकर मुंढे, गट शिक्षणाधिकारी विजय पवार, पोषण आहार अधीक्षक सरोज गायकवाड ,मुख्याध्यापक रमेश पाटील,मुख्याध्यापिका कल्पना राठोड, शिक्षक सेना कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, विज्ञान शिक्षक रवींद्र चौधरी यांचे सह सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते.सुमारे एकशे दहा बाल वैज्ञानिकांनी आपले साहित्य या ठिकाणी मांडले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी केले. सूत्र संचलन वाल्मिक पाटील सर यांनी केले. आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख अनिल पाटील यांनी केले.तहसीलदार विजय बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आमदार किशोर अप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत जिज्ञासावृत्तीला विज्ञान प्रदर्शनामुळे चालना मिळत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले. परीक्षक म्हणुन

पंकज देठे, रवींद्र सूर्यवंशी , अल्पा सयानी, रवींद्र चौधरी, उल्हास पाटील यांनी काम पाहिले.विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या सजावटीसाठी कलाशिक्षक महेंद्र खरे, रवींद्र पाटील,महेश पाटील, व्ही डी पाटील,रोहिणी कोळी, पूनम लांडगे ,तुषार पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच आश्रम शाळेचे माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक व वस्तीगृह कर्मचारी शिक्षक वृंद शिक्षिका, गट साधन केंद्राचे कर्मचारी व विशेष शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विज्ञान प्रदर्शनासाठी शिक्षकेतर कर्मचारी वस्तीगृह कर्मचारी पंढरी राठोड,राजेंद्र पाटील, गिरधर गायकवाड ,ईश्वर सावंत , लहू पाटील दादाभाऊ सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेसाठी विशेष परिश्रम घेतले.

 

*विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा निकाल खालीलप्रमाणे*

*दिव्यांग गट*

प्रथम क्रमांक सिद्धेश किशोर राऊळ द्वितीय क्रमांक जानवी ईश्वर सातपुते *उच्च प्राथमिक गट*

प्रथम कृष्णा गजानन पाटील

द्वितीय आकांक्षा अमृत गायकवाड तृतीय दर्शन प्रेमराज रावळे

*माध्यमिक उच्च माध्यमिक गट*

प्रथम अनुज अजय बडगुजर

द्वितीय विजयदीप निवृत्ती शिंदे

तृतीय समर्थ काशिनाथ चौधरी *प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य*

प्रथम भूषण कुमार देविदास जगताप द्वितीय विद्या सचिन जोशी

तृतीय भाग्यश्री अशोक अहिरराव *माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य*

प्रथम रवींद्र हिलाल सूर्यवंशी

द्वितीय प्रेमसिंग आनंदा पाटील

तृतीय उल्हास श्रीराम पाटील