_राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय,पारोळा,येथे एरंडोल विभाग,आंतरमहाविद्यालयीन खो-खो व कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न

_राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय,पारोळा,येथे एरंडोल विभाग,आंतरमहाविद्यालयीन खो-खो व कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न ….!!!!_

पारोळा – क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव,अंतर्गत,एरंडोल विभागा क्रीडा समितीतर्फे आंतरमहाविद्यालयीन खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन,राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय,पारोळा येथे करण्यात आले होते,सदर स्पर्धेचे उद्घाटन पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यायाचे संचालक दादासाहेब रोहन मोरे, प्राचार्य डॉ. व्ही आर पाटील सर, उप-प्राचार्य डॉ. अजय पाटील, एरंडोल विभागाचे सचिव डॉ विजय पाटील,डॉ.शैलेश पाटील, डॉ. देवदत्त पाटील डॉ.हर्ष सरदार,डॉ. क्रांती वाघ डॉ. सचिन पाटील,प्रा जे बी सिसोदिया उपस्थीत होते. या स्पर्धा मध्ये कबड्डी खेळा मध्ये प्रताप महाविद्यालय अमळनेर मुलांचा संघ विजयी तर उपविजेता एन वाय एन सी महा. चाळीसगाव, मुली मध्ये आर.एन डी. भडगांव महा.विजयी तर उप विजेता डी डी एस जी कॉलेज ,चोपडा . .. तसेच आंतर महाविद्यालयीन खो- खो स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रताप महाविद्यालय विजयी तर उपविजेता डी डी एस जी महाविद्यालय, चोपडा. तर मुली मध्ये आर एन डी महा. भडगांव विजयी तर उपविजेता चोपडा महाविद्यालय ठरले.
स्पर्धांमध्ये पारोळा , चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, भडगाव, बांभोरी, मारवाड,पाचोरा येथील संघ उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये पंच म्हणून प्रा. किशोर वाघ, डॉ.शैलेश पाटील, डॉ. देवदत्त पाटील,डॉ. संजय भावसार, प्रा.प्रेमचंद चौधरी डॉ.हर्ष सरदार डॉ.विजय पाटील,रोहीत सपकाळे यांनी काम पाहिले . या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उप प्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. संजय भावसार , उत्तम आमले, जयराम महाजन गौतम जावळे व सर्व खेळाडूंनी सहकार्य केले .