पाचोऱ्यात श्री राम मंदिरात पाण्याची मोटर चोरणाऱ्या आरोपीस पाचोरा पोलिसांनी अवघ्या दोन तासात केले अटक

पाचोरा येथील श्रीराम मंदिरातली पाण्याची मोटर चोरणाऱ्या आरोपीस पाचोरा पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीस केले अटक

 

( पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले )

पाचोरा येथील श्रीराम मंदिर मधील विहिरीवर असलेली पाण्याची मोटर ही खराब झाल्या असल्यामुळे तिला दुरुस्ती करण्यासाठी वर काढण्यात आलेली होती पण चोरांनी रात्री ती मोटर चोरून नेली असता श्रीराम मंदिराचे पुजारी श्री सूरदास महाराज यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांना सांगितले असता साहेबांच्या सूचनानुसार श्री सूरदास महाराजांनी तक्रार नोंद केली तक्रार नोंद करताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेबांच्या आदेशाने पोलिसांनी आपले चक्र फिरविले व आपल्या गुप्त माहितीच्या आधारे पाण्याची मोटर साधारणता पाच हॉर्स पॉवर ची असून तिची किंमत सात ते आठ हजार असून ती चोरीला गेली होती पाचोरा पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल पाण्याची मोटरसह त्यांना अटक केली असून पोलिसांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत असून पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब रुजू झाल्यापासून अनेक गुन्हे उघडकीस येत असून पाचोरा पोलिसांची कामगिरी जोरात असून या आरोपीस अटक करण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनचे डीबी कर्मचारी श्री राहुल शिंपी श्री योगेश सुरेश पाटील श्री योगेश अरुण पाटील श्री गजानन काळे यांनी श्रीराम मंदिर परिसरातील सर्व सीसी कॅमेरे चेक करून आरोपीस दोन तासात अटक केले.