महंत लक्ष्मण महाराज कराड यांच्या हनुमान जन्मोत्सवातील किर्तनाने कोपरे येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता

महंत लक्ष्मण महाराज कराड यांच्या हनुमान जन्मोत्सवातील काल्याच्या किर्तनाने कोपरे येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता !

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) पाथर्डी तालुक्यातील डोंगरवाडीच्या श्रीराम संस्थानचे महंत ह.भ.प.लक्ष्मण महाराज कराड यांच्या हनुमान जन्मोत्सवातील काल्याच्या किर्तनाने कोपरे येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता झाली. हा सोहळा १६ ते२३ एप्रिल या काळात संपन्न झाला.लक्ष्मण महाराज कराड यांच्या श्रीकृष्ण चरित्रातील किर्तनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रामायण महाभारतातील अनेक द्रुष्टांत सांगून अनेक धार्मिक पैलूंना स्पर्श करीत गैरवर्तन करणाऱ्या नवतरुणांना मोलाचा योग्य संदेश दिला. या पारायण सोहळ्यात सर्व ह.भ.प.सुर्यभान महाराज केसभट, वैष्णवी महाराज वाघमोडे, हनुमंत महाराज सातपुते, सुदर्शन महाराज कारखेले, महेश महाराज आव्हाड, सोनाली महाराज काळे, एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांची रात्री किर्तने झाली.गावातुन ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा मिरवणूकही काढण्यात आली होती. विठ्ठल उर्फ नानासाहेब जबाजी उघडे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली.गावातील भजनी मंडळ आणि भाविक भक्तांसह पंचक्रोशीतील अनेक गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरे येथील किर्तना नंतर वडुले येथे ही रात्री ह.भ.प.कराड महाराज यांच्या सुमधुर वाणीतील किर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कोपरे येथे गेल्या तेविस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची ही परंपरा ग्रामस्थांच्या सहकार्याने आजही अविरतपणे सुरू आहे.