कोपरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

कोपरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

 

 

 

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) ‌ ह.भ.प.वै.भगवान बाबा ,वै.वामनभाउ,वै. यादवबाबा,वै.नारायण महाराज,वै.बाळूमामा यांच्या आशीर्वादाने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे १६ ते२३एप्रिल या काळात आयोजन करण्यात आले आहे.सर्व ह.भ.प.आनंद मिसाळ, महादेव आव्हाड,ठकाजी दिंडे, प्रल्हाद आंधळे, शंकर भागवत, अभिमन्यू भालसिंग, बाबासाहेब मतकर यांची प्रवचने तर सर्व ह.भ.प.सुर्यभान केसभट, वैष्णवी वाघमोडे, हनुमंत सातपुते, सुदर्शन कारखेले, सोनाली काळे, महेश आव्हाड, एकनाथ चत्तर शास्त्री यांची किर्तने होणार आहेत.दि.२२एप्रिल रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत दिंडी प्रदक्षिणा होणार आहे.दिनांक २३एप्रिल रोजी ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड यांचे सकाळी ९ते११ या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे.अरुण विठ्ठल, नानासाहेब उघडे यांची काल्याची पतंग होणार आहे.,उघडे, ढाकणे, माने, वाघमोडे,खरात,दिंडे, खेडकर, आव्हाड परिवाराच्या वतीने रोज अन्नदान करण्यात येणार आहे.या काळात दररोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, किर्तन ,प्रवचन, हरिपाठ,जागर, असे कार्यक्रम होणार आहेत. ह.भ.प.सोपान महाराज ढाकणे, भालसिंग महाराज, दत्तात्रय राजळे महाराज कोपरे ग्रामस्थ आणि भजनी मंडळ यांच्यातर्फे हा सोहळा संपन्न होत आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कोपरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.