पाचोऱ्यात श्री शेठ मुरलीधर जी मानसिंग कॉलेज व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अमृत महोत्सव उत्स्फूर्तपणे साजरा

पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधर जी मानसिंग का कॉलेज व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त भरगच्च देशभक्तीवर आधारित भव्य गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एक शाम देश के नाम अति उत्साहाने पार पाडण्यात आला

(पचोरा प्रतिनिधि ) पाचोरा येथील महाल पुरे मंगल कार्यालय येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणी जागा राहाव्या याकरिता स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी पाचोरा तालुक्याचे माजी आमदार श्री भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ विशेष प्रतिनिधी पाचोरा तालुक्याचे प्रांताधिकारी साहेब श्री विक्रम बांदल पाचोरा तालुक्याचे तहसीलदार साहेब श्री कैलास चावडे पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री नानासो संजय ओंकार वाघ पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे सचिव श्री दादासो एडवोकेट महेश भाऊ देशमुख संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री नानासो व्ही.टी.जोशी, पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे स्थायी समिती सदस्य श्री नानासो सुरेश , तसेच पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे संचालक श्री सिताराम , सर श्री दत्ता आबा , श्री प्रकाश पाटील, श्री शशिकांत चंदिले, श्री संदीप महाजन, श्री जगदीश बापू सोनार, लॉटरी क्लब चे ज्येष्ठ सदस्य भरतदादा सिनकर, श्री शालिग्राम मालकर, तसेच प्रोफेसर श्री डॉक्टर सुनील कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र विभागीय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक उपस्थित होते व जळगाव जिल्हा माजी सैनिक संघ श्री बाळू मोतीराम पाटील, पाचोरा तालुका वीर जवान माजी सैनिक संस्था संचालक श्री दीपक पाटील, पाचोरा तालुका उपाध्यक्ष श्री मधुकर पाटील, पाचोरा तालुका जवान फाउंडेशन संस्थेचे उपाध्यक्ष उत्तम सिंग जयसिंग निकुंभ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत जोरदार व उत्साह पूर्ण सुरू झाली या कार्यक्रमात देशभक्तीवर आधारित गीतामध्ये अनेक गायकांनी भाग घेतला यामध्ये श्री राकेश सपकाळे सर, कुमारी रोशनी. पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय तहसीलदार उत्कृष्ट गायक उत्कृष्ट वकृत्व उत्कृष्ट भाषा सर्व गुण संपन्न असलेले श्री कैलासजी चावडे साहेब, यांनी देशभक्तीवर गीत गाऊन प्रेक्षकांचे मन जिंकली व कार्यक्रमात बहार आणली यानंतर श्री डॉक्टर भरत प्रजापत, श्री रुपेश प्रजापत, तसेच डॉक्टर. प्रविण माळी यांचे चिरंजीव वेदांत माळी यांनी देशभक्ती वर गाणे गाऊन आनंद व्यक्त केला. अशा अनेक कलाकारांनी भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी गावातील प्रतिष्ठित राजकीय सामाजिक अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महिलांची संख्या भरगच्च होती तनिष्का महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जे. व्ही. पाटील सर यांनी केले. सूत्रसचलन व आभार श्री माणिक पाटील सर यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाचोरा कॉलेजचे प्राचार्य श्री वासूदेव वलें सर तसेच कॉलेजचे प्राध्यापक व प्राध्यापीका व सर्व कर्मचारी वर्ग ने मदत केली.