नांद्रा येथील हायस्कूलमध्ये मोफत वस्तीगृहात प्रवेशासाठी आवाहन

नांद्रा येथील हायस्कूलमध्ये मोफत वस्तीगृहात प्रवेशासाठी आवाहन

नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी )
जळगाव जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे नांद्रा तालुका पाचोरा येथे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचलित यशवंतराव चव्हाण दलित वस्तीगृह( छात्रालय) नांद्रा(मा )ता पाचोरा जिल्हा जळगाव वस्तुगृहात तालुक्यातील व जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येत आहेत या ठिकाणी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वस्तीगृहात मोफत प्रवेश देणे सुरू असून असून यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय तसेच मराठा, कुणबी, दारिद्र रेषेखालील विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा देण्यात येईल गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी वस्तीगृह अधीक्षक यशवंतराव चव्हाण दलित छात्रालय नांद्रा(मा )तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे