तिसगाव,कासार पिंपळगाव टाकळी,कोपरे, परीसरात वाघोलीच्या वै.यादवबाबा दिंडीचे जोरदार स्वागत

तिसगाव,कासार पिंपळगाव टाकळी,कोपरे, परीसरात वाघोलीच्या वै.यादवबाबा दिंडीचे जोरदार स्वागत

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील वैकुंठवासी सदगुरू यादवबाबा वाघोलीकर यांच्या पंढरपूर येथे जाणाऱ्या दींडीचे तिसगाव,कासार पिंपळगाव,टाकळी कोपरे,शिरापूर,व्रुद्धेश्वर, गंगादेवी येथे जोरदार स्वागत करण्यात आले.वाघोली येथून दिनांक २३ जून रोजी सकाळी प्रस्थान होउन कोपरे येथे शहाजी वाघमोडे मंत्री,यांनी प्रीती भोजन,बळीराम खरात,यांनी नाष्टा धोंडीबा दींडे,जगन्नाथ महाराज आव्हाड यांनी चहापाणी देउन स्वागत केले.हनुमान टाकळी येथे संत वामन भाउ आणि भगवान बाबा मंदिरात सौ.चंद्रकला व शिवनाथ दगडखैर यांनी नाष्टा दिला.बंडु बर्डे आणि संदिप बर्डे मेजर यांनी नाष्टा,ग्रामसेवक सुरेंद्र बर्डे यांनी चहापाणी तसेच अर्जुन जगताप यांनी नाष्टा देउन स्वागत केले.कासार पिंपळगाव येथे प्रतिक नानासाहेब भगत यांनी रात्री मुक्कामी जेवण देऊन सकाळी पत्रकार सुनिल नजन आणि अरविंद दत्तात्रय भगत सर, यांनी नाष्टा देउन जोरदार स्वागत केले.विनायक रामकिसन म्हस्के यांनी चहापाणी केले.तिसगाव येथे राजेंद्र नाचन व प्रकाश आव्हाड यांनी चहापाणी करून अरुणराव पुंड आणि भाऊसाहेब ससाणे यांनी दुपारचे प्रीती भोजन दिले.शिरापुर येथे आदिनाथ लवांडे यांनी चहापाणी तर व्रुद्धेश्वर येथे लक्ष्मण पुरी यांनी नाष्टा दिला गंगादेवी येथील भगवान कुटे यांच्या वस्ती वर दुसरा मुक्काम करण्यात आला.वैकुंठवासी यादव बाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे हे ९० वे वर्ष आहे.ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भालसींग आणि यादव बाबा वारकरी संस्था विश्वस्त मंडळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथून वेदशास्त्रसंपन्न विष्णुपंत भालेराव यांच्या हस्ते पुजन करून ही दींडी रवाना झाली.दिनांक २३ जून ते ७ जुलै या कालावधीत या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.पुढे वेलतुरी,गवखेल, घाटापिंप्री,दादेगाव, गीतेवाडी,देवीलिमगाव,केरुळ,राघापूर, सिदेवाडी, आष्टी,वाळूंज,पारगाव जोगेश्वरी,बळेवाडी, तरटगाव,मलठण, चापडगाव,जातेगाव करमाळा,गुळसडी, वडशिवणे,वरकटणे, सातोली,दहीवली, तांबवे,परीते,करकंब, वांगीकर भोसे,होळे,चिलाईवाडी, मार्गे पंढरपूर येथील शिवयोगी मंगल भवनात मुक्काम असा या दींडी सोहळ्याचा प्रवास मार्ग ठरवन्यात आलाआहे. पंचक्रोषीतील अनेक गावातील दींड्या पंढरपूरच्या दिशेने आगेकूच करीत आहेत.