लासुरा ता. पाचोरा येथे हनुमान जन्मोत्सव आनंदात साजरा

लासुरा ता. पाचोरा येथे हनुमान जन्मोत्सव आनंदात साजरा

येथे सालाबादप्रमाणे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला‌. हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे प्रसादाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठण करून महाआरती करण्यात आली. तसेच ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पवनपुत्र हनुमानाची प्रतिमा पूजन व मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत तरुणांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. यानंतर हनुमंताला नैवेद्य देऊन भंडाऱ्यास सुरुवात झाली. भंडाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी गावातील सर्व नागरिक स्वयंप्रेरणेने कार्यक्रमास उपस्थित राहून आपली सेवा देतात. प्रसंगी गावासह परिसरातील हनुमान भक्तांनी हनुमान चालीसा पठण, महाआरतीष मिरवणुकीसह महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमान शिवतेज मित्र मंडळ, जय श्रीराम मित्र मंडळ, तडवी मित्र मंडळ, ग्रामस्थ व हनुमान भक्तांनी परिश्रम घेतले.