श्री.गो.से. हायस्कूल, विद्यालयात अध्यात्मा आणि व्यसनमुक्ती हा कार्यक्रम संपन्न

अध्यात्मा व व्यसनमुक्ती कार्यक्रम

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था व संचलित श्री.गो.से. हायस्कूल, पाचोरा या विद्यालयात अध्यात्मा आणि व्यसनमुक्ती हा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री. गो.से. हायस्कूल या विद्यालयात विद्यालयाचे उपमुख्याध्यापक. एन आर. पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली पी. एम.पाटील, तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत अध्यात्मा आणि व्यसनमुक्ती, ध्यानधारणा प्रात्यक्षिक रामद्वारा केंद्र जळगाव येथून . पुंडलिक गाडगे व त्यांच्यासोबत गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना बाल संस्कार तसेच बालवयातच व्यसनाचे दुष्परिणाम व मनुष्य देहाचे महत्त्व यांची जाणीव करून देऊन व्यसनापासून दूर राहिल्याशिवाय परमात्म्याची अनुभूती व सुखी जीवन होऊ शकत नाही.अशी माहिती व ध्यानधारणा प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तात्यासो.पुंडलिक गाडगे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी. बोरसे यांनी केले तर आभार ए. एस. कुमावत यांनी मांडले यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी सहकार्य केले…