कांबीतील कैलास काकडेच्या खुनातील संशयित आरोपी सिद्धांत गवारे याच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या

कांबीतील कैलास काकडेच्या खुनातील संशयित आरोपी सिद्धांत गवारे याच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील कांबी येथील मयत कैलास काकडे यांच्या खुनातील संशयित आरोपी सिद्धांत गवारे याच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील कांबी येथील कैलास काकासाहेब काकडे याचा बोधेगाव शिवारातील शेवगाव -गेवराई रोडवरील हाॅटेल राकासमोर कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव कोणत्या तरी टणक हत्याराने पाठीवर, डोक्यावर,जबर मारहाण करून जीवे ठार मारून खुन केला आहे.अशा आशयाची फिर्याद मयत कैलास काकडे यांचा भाऊ विलास काकासाहेब काकडे राहणार,कांबी तालुका, शेवगाव, जिल्हा,अहिल्यानगर यांनी शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ५५२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे दिनांक २२/६/२०२५ रोजी दाखल केली होती.सदर ठिकाणी शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील,शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलिस उपनिरीक्षक प्रविण महाले, यांनी तात्काळ भेट देऊन घटना स्थळांची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती.या खुनाच्या तपासासाठी पोलीसांची दोन स्वतंत्र पोलिस पथके तयार करून ती हातगाव,कांबी, बोधेगाव,बालमटाकळी भागात या खुनाच्या तपासासाठी पाठवून दिली होती.पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १९ जून रोजी मयत कैलास काकडे आणि त्याची पत्नी हे बोधेगाव येथे आले होते.मयत कैलास काकडे यांनी आपल्या पत्नीला तु छत्रपती बॅंकेसमोर थांब मी बाथरूमला जाऊन येतो असे सांगून ते तेथुन निघुन गेले होते. परंतु आपले पती परत लवकर माघारी न आल्याने त्यांच्या पत्नीने कांबी येथील आपले घर गाठले होते.त्या नंतर दिनांक २०जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मयत कैलास काकासाहेब काकडे हे हाॅटेल राकासमोर म्रुतावस्थेत आढळून आले होते.मयत कैलास काकासाहेब काकडे यास दारुचे व्यसन लागले होते.त्याच्याकडे अनेक लोकांचे हातउसने घेतलेले उधारीचे पैसे होते त्यामुळे त्याने पंधरा दिवसा पूर्वी त्याच्या वाट्याला आलेल्या एक एकर जमीनीपैकी अर्धा एकर जमीन विकली आहे.पोलिसांच्या तपासात गुप्त बातमीदार कडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सिद्धांत मंगेश गवारे (वय २३) राहणार, बोधेगाव, तालुका,शेवगाव, जिल्हा,अहिल्यानगर हाच असल्याचे समजताच पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याचा विश्वास संपादन करून त्याच्या कडे या गुन्ह्याची माहिती विचारली असता त्यानें सदर गुन्हा आपणच केला असल्याची कबुली शेवगाव पोलीसांना दिली आहे.मग शेवगाव पोलिसांनी सिद्धांत मंगेश गवारे, (वय२३)राहणार बोधेगाव,तालुका, शेवगाव,जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन या गुन्ह्यात अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आणि शेवगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.सदरची कारवाई ही जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील आणि शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप, पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, चंद्रकांत कुसारे, परशुराम नाकाडे, पोलिस नाईक उमेश गायकवाड, ईश्वर गर्जे, पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर,प्रशांत आंधळे,एकनाथ गर्कळ,संपत खेडकर, ईश्वर बेरड,राजू बडे, भगवान सानप, देविदास तांदळे तसेच अहिल्यानगर दक्षिण सायबर सेलचे पोलिस काॅंन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली आहे.पुढील तपास शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे करीत आहेत.