सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 100% तर कला शाखेचा 92.60% निकाल
पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा निकाल 100% लागल्याने विद्यार्थी व पालक आनंदित
आमडदे प्रतिनिधी
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे या शाळेतील *इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे त्यात
विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून त्यात 51 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा निकाल 100% लागल्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्ग आनंदीत झाला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांपैकी पहिले पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे-
1) पाटील ऋषिकेश निलेश 82.00%
2) पाटील मनीष सचिन 81.50%
3) पाटील सचिन समाधान 80.33%
4) पाटील यशोदीप रमेश 79.83%
5) पाटील प्रांजल दीपक 79.67%
अशाप्रकारे आमडदे येथील विज्ञान शाखेने पहिल्याच वर्षी 100% निकाल लावून घवघवीत यश संपादन केले आहे तर याच *कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेचा एकूण निकाल 92.60% लागला असून त्यात एकूण प्रविष्ट विद्यार्थी 81 होते त्यात 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून* त्यात प्रथम क्रमांकाचे पाच विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत त्यात
1) पाटील सुरेंद्र शितल 72.83%
2) मोरे साक्षी गौतम 72.50%
2) जैन प्रतिक्षा विनोद 72.50%
3) वंजारी अर्चना विजय 70.83%
4) हटकर सचिन अशोक 69.50%
5) वंजारी पल्लवी देवचंद 69.33%
अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे *संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील संस्थेच्या उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका आदरणीय ताईसाहेब डॉ पूनमताई प्रशांतराव पाटील संस्थेचे सचिव दादासाहेब प्रशांत विनायकराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य आर आर वळखंडे सर पर्यवेक्षक बी एन पाटील सर* तसेच मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे