श्री साई समर्थ मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय भडगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
भडगाव दिनांक 21 जुन 2025 वार शनिवार रोजी आपल्या कै. बापूसो पू.का पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्था गुडे संचलित श्री साई समर्थ मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय भडगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरातील आरोग्य सेवा कार्यक्रम आहे. या दिवसादरम्यान, योगासनांच्या असंख्य फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने विविध स्थानिक आणि जागतिक समुदाय एकत्रितपणे योग करण्यासाठी एकत्र येतात. योग ही एक प्राचीन मन-शरीर विश्रांती चिकित्सा आहे. त्याच प्रमाणे आपल्या विद्यालयातील विद्यार्थी एकत्र येऊन योग करत आहेत व विद्यार्थ्यांना योगा बद्दल चे महत्व काय असतात ते समजून सांगितले… त्या वेळेस शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा मुरलीधर सूर्यवंशी मॅडम तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.