मौजे माहोरा तालुका जाफ्राबाद येथे ओबीसी समाज चिंतन बैठक संपन्न

मौजे माहोरा तालुका जाफ्राबाद येथे ओबीसी समाज चिंतन बैठक संपन्न

 

 

मौजे माहोरा तालुका जाफ्राबाद येथे रविवार दिनांक 21/12/2025 रोजी उपसरपंच बाबासाहेब बोरसे यांचे अध्यक्षतेखाली ओबीसी समाज चिंतन बैठक संपन्न झाली. याप्रसंगी जेष्ठविधीज्ञ व ओबीसी समाजाचिंतक ॲड. एफ. एच. सिरसाठ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ओबीसी समाजाची दशा आणि दिशा आणि उपाययोजना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ओबीसी समाजाने काळाची पाऊले ओळखून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधून आपला सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन देखील ॲड. सिरसाठ यांनी याप्रसंगी केले. आरक्षण हा ओबीसींचा घटनात्मक अधिकार असून त्या हक्काचे संरक्षण, संवर्धन जतन होण्यासाठी ओबीसींनी प्राणपणाने लढा देण्यासाठी व ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यासाठी ओबीसींनी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले. याप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथील बहुजनवादी विचारवंत मु. एम. बी. मगरे यांनी देखील उपस्थित ओबीसी समाजाला उद्देशून सांगितले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून 78 वर्ष आणि भारतीय संविधान लागू होऊन 76 वर्ष झाली आहेत परंतु अद्यापही ओबीसींना शासन प्रशासनात योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेले नाही. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत केवळ त्यांच्या मताचा वापर करून त्यांना त्यांचे हक्क अधिकारापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे तमाम मागासवर्गीय यांनी आपापल्या जातीच्या ओळखीत अल्प व वेगळे न राहता बहुजन ओळखीत संघटित होण्याची गरज आहे. या याप्रसंगी सुनील सिरसाठ, बालाजी ढवळे, संदीप शेळके, गजानन शहागडकर, प्रमोद शहागडकर, दत्तात्रय शहागडकर, दिगंबर ढवळे, दीपक बोरसे, अरुण सिरसाठ, शंकर गांडुळे, ऋषिकेश अहिरे, सुभाष धारे, संतोष पंडित, बाबासाहेब बोरसे, राजू सिरसाठ, कृष्णा तोंडे, शिवाजी सिरसाठ, संतोष सोनुने, बाळासाहेब गव्हले, विजय छडीदार, संतोष गौरकर, संतोष वरपे, गणेश पगारे, प्रकाश सिरसाठ, ज्ञानेश्वर निकम, सतीश लाखोले, बंडू लाखोले, कृष्णा पोफळे यांचे सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व परिचय प्रमोद शहागडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिगंबर ढवळे यांनी केले.