श्री. गो.से हायस्कूल पाचोरा येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन

श्री. गो.से हायस्कूल पाचोरा येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित. श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त श्री .गो.से. हायस्कूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हुतात्मा स्मारकापर्यंत भव्य मशाल रॅली काढून शहरवासी यांचे यांचे लक्ष वेधून घेतले. यात भारत माता, शहीद भगतसिंग ,राजगुरू सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी , लोकमान्य टिळक, वीर सावरकर, , राणी चेतन्मा, उषा मेहता, अहिल्याबाई होळकर, मॅडम भिकाजी कामा, कस्तुरबा गांधी, चाफेकर बंधू, शिरीष कुमार, इत्यादी महापुरुष हुतात्मे शूरवीर, महापुरुष यांचा पोशाख व पेहराव करून भारत माता की जय, नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचा विजय असो, देशभक्तीपर घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील हुतात्मा स्मारक येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत गायनातआले. शहरातील माजी सैनिक यांचा नगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुष ,महात्मे, यांच्या विषयी भाषण देऊन घोषणांचा जयजयकार करण्यात. पाचोरा शहरातील विविध शैक्षणिक राजकीय, शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाचोरा शहरात भव्य रॅली काढून विद्यार्थ्यांनी नगरपालिकेस सहकार्य केल्याने शाळेचे आभार व्यक्त करण्यात आले. नगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांना अल्पपो आहार देण्यात आला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन आर पाटील, पर्यवेक्षक ए बी अहिरे यांनी रॅलीत सहभाग घेतला .पर्यवेक्षिका अंजली गोहिल, प्रतिभा पाटील, शितल महाजन, वैशाली कुमावत, चंदा चौधरी, गायत्री पाटील, संजय करंदे, अरुण कुमावत, रवींद्र बोरसे, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, संदीप मनोरे इत्यादी शिक्षक बंधू भगिनींनी रॅलीत सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत शाळेतर्फे व नगरपालिकेतर्फे विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी हातात माती घेऊन शपथ घेतली त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.