अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ७५ जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर,कही खुशी कही गम, अनेकांचे टांगा पलटी,घोडे फरार ?

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ७५ जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर,कही खुशी कही गम, अनेकांचे टांगा पलटी,घोडे फरार ?

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण ७५ जिल्हा परीषद गटातील आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली.त्या सोडती मध्ये पुढील प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.गेली पाच वर्षे अनेक गटातील मातब्बर भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मिरवूण घेणाऱ्या अनेक हौशी कलाकार नेत्यांचे मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांचे निवडणुकी अगोदरच टांगा पलटी अन् घोडे फरार झाले आहेत.या आरक्षण सोडतीमुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आरक्षण जाहीर करण्यात आलेले जिल्हा परीषद गट पुढीलप्रमाणे आहेत १) समशेरपूर जिल्हा परिषद गट-अनुसुचीत जमाती पुरुष, २) देवठाण – अनुसुचित जमाती महीला,३) धामणगाव आवारी- सर्वसाधारण महिला,४)राजूर -अनुसुचित जमाती पुरुष,५)सातेवाडी – अनचसुचित जमाती महिला,६)कोतुळ-अनुसुचित जमाती पुरुष,७)समनापुर-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला,८) तळेगाव -सर्वसाधारण महिला,९)आश्वी बु.- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला,१०)जोर्वे-ना.मा.प्रवर्ग पुरुष,११) घुलेवाडी- सर्वसाधारण पुरुष,१२) धांदरफळ-सर्व साधारण पुरुष,१३) चंदनापुरी -ना.मा.प्रवर्ग पुरुष,१४)बोटा- अनुसूचित जमाती महिला,१५) साकुर- अधोरेखित,१६) सुरेगाव-ना.मा. प्रवर्ग महिला,१७) ब्राह्मणगाव- सर्वसाधारण पुरुष,१८) संवत्सर -सर्वसाधारण पुरुष,१९) शिंगणापूर -ना.मा.प्रवर्ग महिला,२०) पोहेगाव बु.-सर्वसाधारण महिला,२१) पुणतांबा -अनुसुचित जाती महिला,२२) वाकडी -अनुसुचित जाती पुरुष २३)साकूरी -अनुसुचित जाती महिला,२४) लोणी खु.- ना.मा.प्रवर्ग पुरुष,२५) कोल्हार बु.-सर्वसाधारण पुरुष,२६) उंदिरगाव- अनुसुचित जाती महिला,२७) टाकळीभान- सर्वसाधारण महिला,२८) दत्तनगर -अनुसुचित जाती पुरुष,२९) बेलापूर बु.-अनुसुचित जाती महिला,३०) बेलपिंपळगाव -सर्वसाधारण महिला,३१) कुकाणा -सर्व साधारण महिला,३२)भेंडा बु.-सर्वसाधारण पुरुष,३३) भानसहिवरे -सर्व साधारण पुरुष,३४)खरवंडी-सर्वसाधरण महिला,३५)सोनई-ना.मा.प्रवर्ग महिला,३६)चांदा-सर्वसाधारण महिला,३७) दहिगाव ने -सर्वसाधारण पुरुष,३८) बोधेगाव -सर्वसाधारण पुरुष,३९) भातकुडगाव – अनुसुचित जाती महिला,४०) लाडजळगाव -ना.मा.प्रवर्ग महिला,४१) कासार पिंपळगाव -सर्व साधारण पुरुष,४२) भालगाव- सर्वसाधारण पुरुष,४३) तिसगाव -सर्व साधारण पुरुष,४४)मीरी- सर्वसाधारण महिला,४५) टाकळीमानुर-सर्वसाधारण महिला,४६) नवनागापुर- सर्वसाधारण महिला,४७)जेउर-ना.मा.प्रवर्ग महिला,४८) नागरदेवळे- अनुसुचित जाती महिला,४९) दरेवाडी- अनुसुचित जाती महिला,५०) निंबळक -ना.मा.प्रवर्ग पुरुष,५१)वाळकी-ना.मा.प्रवर्ग पुरुष,५२) टाकळीमियां -ना.मा.प्रवर्ग महिला,५३) ब्राह्मणी -सर्वसाधारण पुरुष,५४) गुहा -सर्वसाधारण पुरुष,५५) बारागाव नांदुर- अनुसूचित जमाती महिला,५६) वांबोरी -सर्वसाधारण महिला,५७) टाकळी ढोकेश्वर -सर्वसाधारण महिला,५८) ढवळपुरी -सर्वसाधारण महिला,५९) जावळा-ना.मा. प्रवर्ग पुरुष,६०) निघोज – ना.मा.प्रवर्ग पुरुष,६१)सुपा -ना.मा.प्रवर्ग महिला,६२) येळपणे- सर्वसाधारण पुरुष,६३) कोळगाव -सर्वसाधारण पुरुष,६४) मांडवगण -सर्वसाधारण महिला,६५) आढळगाव- सर्वसाधारण महिला,६६) बेलवंडी-सर्व साधारण पुरुष,६७)काष्टी-ना.मा.प्रवर्ग पुरुष,६८) मिरजगाव -सर्वसाधारण पुरुष,६९) चापडगाव-सर्व साधारण महिला,७०) कुळधरण-ना.मा.प्रवर्ग पुरुष,७१) कोरेगाव – सर्व साधारण महिला,७२)राशिन -ना.मा.प्रवर्ग पुरुष,७३)साकत-सर्वसाधारण पुरुष,७४) खर्डा -सर्व साधारण पुरुष,७५)जवळा-ना.मा.प्रवर्ग महिला या प्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील ७५ जिल्हा परिषद गटातील सदस्य पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.या आरक्षण सोडती मुळे अनेक जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे.