“डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टर दाम्पत्याचा आगळा वेगळा उपक्रम”

“डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टर दाम्पत्याचा आगळा वेगळा उपक्रम”

पाचोरा ( प्रतिनिधी)
एक जुलै हा भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे डॉक्टर भारतरत्न बी सी रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा होतो.

आज पाचोरा शहरात सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यालयातील मतिमंद विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. डॉक्टर स्वप्नील प्रल्हादराव पाटील, डॉक्टर ग्रिष्मा पाटील व विद्यालयाचे प्रदीप पांडे सर यांच्या संकल्पनेतून हे आरोग्य शिबिर संपन्न झाले.

यात तपासणी तज्ज्ञ म्हणून सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बालरोग तज्ञ डॉक्टर ग्रिष्मा पाटील यांनी सेवा बजावली. या शिबिरात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच रक्तगट व बाकी रक्त चाचण्यांची तपासणी केली गेली. आरोग्य तपासणी शिबीरानंतर विद्यालयाचे विद्यार्थ्यांना खाऊ व क्रीडा साहित्याचे वाटप केले गेले.

या आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉक्टर भिकन कपाटे, सिद्धिविनायक लॅबचे संचालक यशवंत मांडोळे, राहुल राठोड, शुभम निकम, मोहित पाटील व स्व कालिंदीबाई मतिमंद निवासी विद्यालयाचे शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप प्रदीप पांडे सरांनी केला. यात त्यांनी सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर स्वप्नील पाटील व बालरोग तज्ञ डॉक्टर ग्रिष्मा पाटील यांचे आभार व्यक्त केले.