डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राज्यस्तरीय पुरस्कार 2022 ने नूर खान इलिहास यांचा सन्मान

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राज्यस्तरीय पुरस्कार 2022 ने नूर खान इलिहास यांचा सन्मान

नांद्रा ता. पाचोरा (वार्ताहर ) जळगाव जिल्ह्याची नामांकित संस्था आदिलशहा फारुकी या संस्थेच्या वतीने यंदाच डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम पुरस्कार श्री नूर खान इलियास खान उप शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा माहिजी .ता.पाचोरा यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन शैक्षणिक समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हा कार्यक्रम दि 8 मे 2022 रविवार रोजी अल्पबचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी पुरस्कार संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शि.वि.अधिकारी विजय पवार साहेब होते, तसेच मनियार बिरादरी जि.अध्यक्ष फारूक शेख साहेब, मजीद जकरिया सर, डॉ.पाकिजा पटेल मॅडम,फारूक पटेल सर,जावेद सर. रेहान सर व संस्थाचे अध्यक्ष फारुक शाह सर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कुरंगी सामनेर केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक शिक्षिका वृंद यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे