जिल्हा परिषद उर्दू शाळा पाचोरा येथे सव रक्षणाचे प्रशिक्षण

जिल्हा परिषद उर्दू शाळा पाचोरा मध्ये सव रक्षणाचे प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या प्रयत्ना करणारी व औपचारिक सोबत अनौपचारिक माध्यमातून शिक्षण देणारी जि.प.उर्दू कन्या व मुलांची शाळा पाचोरा येथे विद्यार्थ्यांना सवरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.राणी लक्ष्मी बाई आत्मरक्षा प्रशिक्षण स्किल कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मार्फत विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले.विद्यार्थ्यांना सवसंरक्षण प्रशिक्षण, मुलींना मानसिक, बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या पुरेसे बनवण्यासाठी व संकटाच्या आणि असुरक्षितेच्या वेळी स्वसंरक्षण व कठीण परिस्थितीच्या सामना करण्यासाठी मुलींना सवकौशल्यात पारंगत करणे,आत्मनिर्भरता व जागरूकता विकसित करणे यासाठी कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आला. कराटे हे संरक्षणासाठी व आणीबाणीवेळी कशा उपयोगी ठरतात या बाबत शेख कदीर व जावेद रहीम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी केंद्रप्रमुख कदिर शेख, शाहेदा हारून, शाहेदा युसुफ, सूमय्या देशमुख, असमा तबस्सुम, सलाउद्दिन शेख, शाईस्ता देशमुख, सलमा कौसर, शेख जावेद रहिम व छोटू भाऊ उपस्थित होते.