Home महाराष्ट्र शिवाजीनगर आमखेडा येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ...

शिवाजीनगर आमखेडा येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा

शिवाजीनगर आमखेडा येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा

 

 

सोयगाव | प्रतिनिधी दत्तात्रय काटोले

तालुक्यातील शिवाजीनगर, आमखेडा येथे श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर संस्थान व ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा सोमवार दि. ९ मार्च २०२६ ते सोमवार दि. १६ मार्च २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

 

भगवान पांडुरंगाच्या कृपेने तसेच संत-महंतांच्या आशीर्वादाने, प.पू. वै. रामकृष्ण नाईक (वाडा) यांच्या आशीर्वादाने व ह.भ.प. भागवत महाराज गाडेकर तसेच ह.भ.प. रविंद्रजी महाराज पेरेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावात हा धार्मिक सोहळा साजरा करण्यात येणार असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

या सप्ताहात विविध ठिकाणांहून नामांकित कीर्तनकार महाराज उपस्थित राहणार आहेत. यात ह.भ.प. पंकज महाराज पाटील (वारकरीभूषण, मुक्ताईनगर), ह.भ.प. सौ. सविताई शाखी (भागवताचार्य, मलकापूर), ह.भ.प. श्वेता दीदी दुधे (युवा कीर्तनकार, सारवे ता. पाचोरा), ह.भ.प. अतुल महाराज काळे (शिवचरित्रकार, बेटावद), ह.भ.प. शिवाजी महाराज तालेकर (भागवताचार्य, भोकरदन), ह.भ.प. महादेव महाराज गणेश (भागवताचार्य, खामगाव), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील (भागवताचार्य, शेलवड ता. बोदवड) तसेच ह.भ.प. रविंद्रजी महाराज पेरेराव (सोयगाव) यांची कीर्तने होणार आहेत.

 

दैनंदिन कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :

पहाटे ५ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ श्री पांडुरंगाची महापूजा व विष्णुसहस्त्रनाम, दुपारी १ ते ४ संगीतमय श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, तर रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत कीर्तन होऊन त्यानंतर जागरण कार्यक्रम होणार आहे. दररोज भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

 

या सप्ताहासाठी विविध यजमान व सेवेकरी पुढाकार घेत असून त्यामध्ये डॉ. मोहितकुमार सीताराम जोहरे (रायगाव), केदारनाथ तुकाराम खताळ, अर्जुन शंकर रावळकर (रामजीनगर), दिलीप पुंडलिक रावणे, तान्हाजी मिका जाधव, कै. रामदास लाडूबा फुसे (सर) स्मरणार्थ, कृष्णा सीताराम पंडित, पुल्लेवाद साहेब (आमखेडा), गोपाल सारंग सोहनी (सोयगाव), त्र्यंबक काशिनाथ अप्पा कुर्लेकर (रामकृष्णनगर), ह.भ.प. अविनाश महाराज (सोयगाव), ह.भ.प. दीपक महाराज थोरात, ह.भ.प. गौतम महाराज गुजर चोपदार, तान्हाजी गायकवाड आदींचा सहभाग राहणार आहे.

 

संगीत साथसंगतीसाठी ह.भ.प. सोनाजी पिसाल (आमखेडा), ह.भ.प. महेंद्र पिंगळवार (सोयगाव), ह.भ.प. कृष्णा कळवत्रे, ह.भ.प. रामभाऊ सोहणी, ह.भ.प. संतोष सोनवणे हे हार्मोनियम वादन करणार आहेत. तबला साथसंगत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज राऊत (अमरावती) तर इतर वाद्य साथसंगत ह.भ.प. दीपक महाराज पाटील (पाचोरा) व ह.भ.प. रघुनाथ महाराज (पाळची) देणार आहेत.

 

या कार्यक्रमात गायन सेवा ह.भ.प. रविंद्रजी महाराज पेरेराव, ह.भ.प. निवृत्ती महाराज मोहने, ह.भ.प. नागेश महाराज (बलवरपूर), ह.भ.प. संजय महाराज पाटील, ह.भ.प. कापशीकर, ह.भ.प. जितेंद्र महाराज पंडित, ह.भ.प. शरद महाराज पवार, ह.भ.प. महांदार, ह.भ.प. जिभाग पाटील (शेंदुर्णी), ह.भ.प. राहुल मिसळ (गोपांग) आदी करणार आहेत.

 

दररोज सकाळ व सायंकाळी महाप्रसादासाठी विविध अन्नदाते पुढाकार घेत असून विशाल शंकर पवार, सुनिल पांडूरंग सोनवणे, आकाश विलास बोरसे, जय गजानन महाराज, विष्णू कडूबा पंडित, रंगनाथ काशिनाथ अंडोले, प्रदीप शिवाजी रोकडे, पंढरी आनंदा बांबर्डे, अल्काबाई भिका गवळी, बाबुराव तोताराम सोनवणे, राजेंद्र वसंतराव चौधरी, निवृत्ती बाळनाथ कापसिकर, अशोक तुकाराम वाघ, प्रविण किशोर जैस्वाल आदींचे सहकार्य लाभणार आहे.

 

शिवाजीनगर आमखेडा येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात हा सप्ताह पार पडणार असून सोयगाव परिसरातील वारकरी, भाविक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

या धार्मिक सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल-रुख्मिणी मंदिर संस्थान व ग्रामस्थ मंडळी, शिवाजीनगर आमखेडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

विशेष सहकार्य : श्री महामुनी अगस्ति महाराज वारकरी शिक्षण संस्था, आमखेडा.

संपर्क : ९४२१३४३६०८ / ७७९८१९०४४९ / ९४२३२४६७८२.

Don`t copy text!