पाचोरा येथील सुप्रसिद्ध डॉ.स्वप्निलदादा पाटील यांना सप्तरंग फाउंडेशन तर्फे आरोग्य दूत म्हणून सन्मान व पुरस्कार प्रदान

पाचोरा येथील सुप्रसिद्ध मल्टी स्पेशलिस्ट डॉ.सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर स्वप्निल दादा पाटील यांना सप्तरंग फाउंडेशन तर्फे आरोग्य दूत म्हणून सन्मान व पुरस्कार देण्यात आला.

(पाचोरा प्रतिनिधि )
पाचोरा येथील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल के संचालक श्री स्वप्निल दादा पाटील यांनी तीन वर्षापासून हॉस्पिटल चालू केले असून त्या माध्यमातून त्यांनी पाचोरा भडगाव तालुक्यातील शहरातील व आजूबाजूच्या सर्व खेड्यापाड्यातील नागरिकांना कुठलाही आजार असो त्यासाठी तात्काळ सेवा देऊन त्यांना आजारातून मुक्त करून रोगमुक्त करतात. तसेच कुठल्याही आजाराचा पेशंट असो त्याला जळगाव जाण्याची वेळ येत नाही कारण हॉस्पिटलला सर्व प्रकारच्या मशनरी उपलब्ध असल्यामुळे तात्काळ इलाज करून पेशंटची काळजी घेतली जाते तसेच डॉक्टर श्री स्वप्निल दादा पाटील यांनी कोरोना काळातही अनेक पेशंटांना जीवदान दिले तसेच प्रत्येक खेड्यात आरोग्य शिबिर भरून खेड्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारे सुविधा दिल्या, या सर्व कामाची दखल जळगाव येथील सप्तरंग फाउंडेशन या संस्थेतर्फे डॉक्टर श्री स्वप्निल दादा पाटील यांना “आरोग्य दूत सन्मान पुरस्कार 2022” देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सिनेमा सृष्टीतील सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री शिवाली परब (महाराष्ट्राची हास्य जत्रा या फेमस नाटकाची भूमिका सादर करणारी कलाकार) यांच्या हस्ते देण्यात आला, यावेळी रावेर येथील श्री साईराम प्लास्टिक व श्रीराम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम पाटील तसेच जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांतजी गवळी साहेब व मराठी सिने अभिनेत्री विना जगताप यांच्या उपस्थितीत हा सन्मान व पुरस्कार देण्यात आला