महोदय,आता हाॅटेल ढाब्यावर दारू प्याल तर न्यायालयाचे हेलपाटे अटळ, पुण्यातील ढाबे मालकावर दंडात्मक कारवाई,अहिल्यानगर जिल्ह्यामधील एक्साईज खाते मात्र झोपलेले
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महोदय आता ढाबा, हाॅटेलवर दारू प्याल तर न्यायालयाचे हेलपाटे अटळ आहेत.पुण्यातील ढाबे मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील एक्साईज खाते मात्र गेंड्याची कातडी पांघरून झोपी गेलेलेच दिसते. ढाब्यावर केवळ जेवनाचीच परवानगी देण्यात आलेली असते.रेस्टारंट आणि बार वगळता इतर कोणत्याही ठिकाणी दारू पिणे कायद्याने गुन्हा मानला जातो. या साठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे देऊन रीतसर परवानग्या घ्याव्या लागतात. पण तसे न करता अनेक ठिकाणी बाहेरून दारू आणून ढाब्यावर पिण्याचे प्रमाण वाढले आहे.काही ठिकाणी ढाबाचालक स्वतः लोकांना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहेत असे अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडीवरून निष्पन्न झाले आहे.१ जानेवारी २०२५ ते ३० एप्रील २०२५
या कालावधीत पुणे उत्पादन शुल्क विभागाने १००५ व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली आहे आणि ३४६ ढाबे मालकावर गुन्हेही दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा दंडही वसुल केला आहे.अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडीत २१ लाख ४६ हजार २५० रुपयांचा अवैध दारू साठा व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दारू पिणे,विकत घेणे,जवळ बाळगणे,या साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १दिवसाचा,१वर्षाचा, आणि आयुष्य भराचा परवाना दिला जातो.हा परवाना आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला की मिळवता येतो.या साठी ५ ते १००० रुपया पर्यंत शुल्क आकारले जाते.देशीदारू साठी एक दिवसाचा परवाना केवळ १ रूपयात उपलब्ध आहे.पण ढाब्यावर दारू पिणे आणि विक्री करणे यास बंदी आहे.असे प्रकार निदर्शनास आल्यास एक्साईज विभागाकडून भरारी पथकाद्वारे तातडीने कारवाई केली जाते आणि हीदंडही वसूल करण्यात येतो.अवैध मद्यसाठा , वाहतूक आणि विक्री करणाऱ्या वरही नियमितपणे कारवाई सुरू आहे.ढाब्यावर दारू पिणे, विक्री करणे,हा कायद्याने गुन्हा असुन अलीकडच्या काळात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालातून समोर आले आहे.या विभागाकडून कडक कारवाई केली जात असुन गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत पुणे विभागाने एकूण १ हजार ५ दारू पिणाऱ्या लोकावर आणि ३४६ ढाबा मालकावर दंडात्मक कारवाई करून दंडही वसूल केला आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात मात्र महामार्ग,राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, तालुका मार्गावर असलेल्या अनेक ढाब्यावर सर्रासपणे अवैध दारू विक्री होत आहे.अनेक ढाबे चालक हे अवैध मार्गाने दारू विक्री करुन आपले गल्ले भरून घेत आहेत आणि शासनाचा महसूल बुडवीत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्पादन शुल्क खाते हे पुर्णपणे झोपलेलेच दिसते. शेवगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी ढाब्यावर आणि हाॅटेलवर बनावट दारू विक्री होत असल्याचे दिसून आले आहे तरी आपले उत्पादन शुल्क खाते गप्प का असा सवाल सर्व सामान्य नागरिक विचारीत आहेत.अनेक ढाब्यावर ढाबे मालक तर आम्ही वरपर्यंत हप्ते देतो आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही अशी शेखी मिरवताना दिसतात.अधिक्रुत बार आणि परमीट सोडले तर शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा तालुक्यातील अनेक राज्य मार्ग आणि महामार्गावर अनेक ढाबे हे अवैध दारूचे ठेलेच बनले आहे.गेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत नगर तालुक्यातील पांगरमल दारू हत्याकांड संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते. तत्कालीन पंचायत समिती महीला सदस्याला पाचही वर्षे नगर तालुक्यातील पंचायत समितीचा कारभार पाहता आला नाही.तेथे निवडणुक काळात विषारी दारूचे काही नागरिक बळी गेले होते.शेवगाव शहरातील काही पत्रकारांनी बनावट दारूचे पितळ उघडे पाडले होते तर त्या पत्रकारांना ही बनावट दारू विक्री करणाऱ्यांनी धमकावले होते.राहुरी, घोडेगाव,नेवासा, नेवासाफाटा,कुकाणा येथे ही बनावट दारूची विक्री केली जात आहे.अशा आशयाच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मंत्री पातळीवर तक्रारी केल्या आहेत ही माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या मंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे.अहिल्यानगर जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या बनावट दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात नेमकी काय कारवाईची भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बार आणि परमीटरुम वगळता अवैध मार्गाने रस्त्यावरील धाब्यावर दारू विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.