फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात बसपाच प्रबळ पर्याय! पक्षाचे राष्ट्रीय महासचिव, खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ यांचे प्रतिपादन

फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात बसपाच प्रबळ पर्याय!
पक्षाचे राष्ट्रीय महासचिव, खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ यांचे प्रतिपादन

मुंबई, ३० एप्रिल

क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी बहुजन समाज पार्टीच प्रबळ पर्याय आहे,असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी, मा.खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ साहेब यांनी केले.महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त शुक्रवारी वाशिम येथे आयोजित भव्य सभेतून त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

पुरोगामीत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संत,पुरूषांच्या विचारानूसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारसा पुढे चालवणाऱ्या बसपाचे हात अधिक बळकट करण्याचे आवाहन यानिमित्ताने डॉ.सिद्धार्थ यांनी केले. यावेळी उपस्थितांनी हात वरू करून केवळ बसपाच्या पाठीशी उभे राहण्याचे अनुमोदन केले. राज्यातील सत्ताधारी एनसीपी-कॉंग्रेस-शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपला बसपा थेट टक्कर देणार असल्याचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका चौरंगी होतील. बसपाचा निश्चित असा ‘व्होट बॅंक’ आहे. मतदारांच्या याच विश्वासासह कॅडरच्या मेहनतीच्या बळावर बसपा ताकदीनीशी समोर येवून राज्यातील ‘बॅलन्स ऑफ पॉवर’ ठरेल, असा विश्वास देखील डॉ.सिद्धार्थ साहेबांनी व्यक्त केला.

सर्वजन हितकारक ‘आयरन लेडी’ बहन सुश्री.बहन मायावती जी यांच्या पाठीशी उभ राहण्यासाठी महाराष्ट्र एवढा उत्साही आहे, हे बघून डॉ.सिद्धार्थ यावेळी भावनिक झाले. उत्तर प्रदेशातील पराभवानंतर देखील पक्षाचा विश्वास डगमगलेला नाही.वाशिम सारख्या मध्यम शहरात हजारोंच्या संख्येतने उपस्थित झालेला जनसमुदाय बसपाच्या शक्तीचे प्रतिक असल्याची भावना यावेळी डॉ.सिद्धार्थ यांनी बोलून दाखवली.यावेळी विचारपीठावर प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह जाटव साहेब, प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब, प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेब, प्रदेश प्रभारी सुनील डोंगरे साहेब तसेच प्रदेश प्रभारी मनीष कावळे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.

वाशिमकरांनी दाखवलेल्या विश्वासाला क्रांतीकारी जयभीम-अँड.ताजने
महामानवांच्या जयंती निमित्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या वाशिमकरांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वास सार्थकी करून दाखवणारच,असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी केले.या भीमशक्तीचा हुंकार मुंबई सह दिल्लीतील सरकारच्या कानात पोहचला आहे. बहुजन हितकार आणि सर्वजन सुखकारक अशी भूमिका पक्षाची असल्याने समाजातील सर्वच वर्ग पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.पक्षाची सकारात्मक अदृश्य शक्ती जमलेल्या गर्दीतून वाशिमकरांनी दाखवून दिली आहे. या तमाम जनसागराला क्रांतीकारी जयभीम करीत पक्षाला सत्ताकारणाच्या दिशेने अग्रेसर करण्याचा संकल्प यावेळी अँड.ताजने यांनी केला.

विकासवादी धोरणासाठी बसपा आवश्यक-नितीन सिंह जाटव
पुरोगामी महाराष्ट्रात विकासवादी धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी बसपा आवश्यक आहे. केवळ फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा वापर करून सरकार स्थापन केले,तर ते बहुजनांचे सरकार ठरत नाही, असा टोला राज्य प्रभारी नितीन सिंह जाटव यांनी महाविकास आघाडी सरकारवर लगावला.बहुजनांसह सर्वजनांच्या विकासासाठी मा.बहन सुश्री मायावती जी यांच्या मार्गदर्शनात बसपाचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होने आवश्यक आहे.या अनुषंगाने राज्यातील नेते,पदाधिकारी आणि कॅडरने सुरू केलेल्या तयारीचे कौतुक यावेळी मा.नितीन सिंह यांनी केले.

राज्यात पक्षाची घोडदौड-मा.प्रमोद रैना
पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वात राज्यात बसपाची घोडदौड सुरू आहे.आगामी निवडणुकांमध्ये आंबेडकरी जनता पक्षाच्या मेहनतीला ‘सत्ताकारणा’चे फळ देत ‘समाजकारणा’साठी प्रतिनिधित्व देईल,असा विश्वास यावेळी राज्य प्रभारी प्रमोद रैना यांनी उपस्थितांना संबोधित करतांना व्यक्त केला.पक्षबांधणी आणि संघटन विस्तार याअनुषंगाने राज्यभरात सकारात्मक वातावरण असून कॅडर आतापासूनच कामाला लागले असल्याचे प्रतिपादन यावेळी रैना यांनी केले.

लेझिम पथकाने स्वागत
वाशिम येथील नालंदा नगरातील मैदानावर आयोजित सभेला उपस्थिम बसपा राष्ट्रीय नेत्यांचे स्वागत लेझीम पथकांने करण्यात आले. यावेळी निळा फेटा घालून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि थोरसंतांना अभिवादन करीत जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय गायक, प्रबोधनकार राहुलजी अन्वीकरण यांच्या खास प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमात प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, प्रदेश उपाध्यक्ष मा.चेतन पवार, प्रदेश महासचिव रवेंद्री गवई, दिगंबर ढोले, प्रदेश सचिव अविनाश वानखडे, देवराव जी भगत, प्रभात खिल्लारे, मा.रंजना ताई ढोरे, प्रदेश कार्यालयीन सचिव अभिजीत मनवर, वाशिम जिल्हा अध्यक्ष मा.बबराव बनसोड,ऍड.संघनायक मोरे ऍड.राहुल गवई , सरकार इंगोले ,देवा इंगळे, राजू भाऊ धोंगडे, गुड्डू भाऊ आराख, भीमरत्न वानखडे, प्रशांत ताजने, प्रकाश आठवले, संतोष वाठोरे, भारत साळवे तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायांचा अथांग जनसागर उपस्थित होता.