प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसुचना विमा कंपनीस देण्याचे आवाहन

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसुचना विमा कंपनीस देण्याचे आवाहन

जळगाव, दि. 23 – खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात भारती ॲक्सा इंन्सुरन्स कंपनीमार्फत राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized calamities) या बाबी अंतर्गत गारपीट, भुस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती जोखीमेतंर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत तसेच अतिवृष्टी, पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतपिकाचे नुकसान झाल्यास पिक विमा घेतलेल्या अधिसुचित पिकांची पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पुर्वसूचना शेतपीकाचे नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंन्सुरन्स ॲप (Crop Insurance app) संबधित कंपनीचे टोल फ्री क्रमांक/बँक/कृषि व महसुल विभाग यांना द्यावी.
अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकची जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बॅक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुका), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत, जळगाव. भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुबंई टोल फ्री क्र. 1800 103 2292, गजानन पाटील, जिल्हा व्यवस्थापक, सामान्य सुविधा केंद्र (सी.एस.सी केंद्र, जळगाव) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.