डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रातात , भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरी होत असते . यावर्षी डॉ बाबासाहेबांची जयंती ही विभिन्न सामाजिक उपक्रमांनी सुप्रसिध्द व्याख्याते , लेखक डॉक्टर संतोष पाटील गोराडखेडेकर व धर्मराज फाऊंडेशनने साजरी केली . डॉ संतोष पाटील यांनी जयंतीनिमित्त विभिन्न झाडांवरती पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली . यासाठी त्यांनी स्वखर्चाने पन्नास मातीचे द्रोण आणले त्याचबरोबर घरी वेस्ट असलेल्या बॉटल कापून त्यापासून द्रोण तयार केले हे सर्व द्रोण त्यांनी दोरीने व लोखंडी तारांच्या मदतीने आपल्या परिसरातील विभिन्न झाडांवरती बांधले झाडांवर बांधताना पुढे पाणी टाकता येईल अशा अंतरावर्ती व्यवस्थितरीत्या बांधले या रखरखत्या उन्हामध्ये चाळीस एक्केचाळीस च्यापुढे तापमान असल्यामुळे पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे खूपदा पाण्याअभावी पक्षांचे प्राण जात असतात पाचोरा येथील विभिन्न परिसरात व शाहूनगरमध्ये त्यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली बाबासाहेबांची जयंती सामाजिक सामाजिक उपक्रमांनी साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले