माहिजी ग्रामपंचायत सरपंच पदी राष्ट्रवादी च्या शोभाबाई पाटील

माहिजी ग्रामपंचायत सरपंच पदी राष्ट्रवादी च्या शोभाबाई पाटील

. नांद्रा(ता.पाचोरा)ता.28 येथील
विद्यमान सरपंच कमलबाई पाटील यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त असलेल्या पदासाठी आज सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली.सरपंच पदासाठी साठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते.चांद बी शेख युनुस आणि शोभाबाई रमेश पाटील यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते.पॅनल प्रमुख आबासाहेब प्रभाकर पाटील यांचे विश्वासू युनुस शेख यांनी यांच्या सौभाग्यवती चांद बी शेख यांना विश्वासात घेऊन माघार घेतल्याने राष्ट्रवादी च्या शोभाबाई पाटील यांच्यी सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी प्रभाकर पाटील माजी सरपंच, नरेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाअध्यक्ष ) उपसरपंच कैलास पाटील , ग्रामपंचायत सदस्य गौतम साळवे,नजराना अल्लाउद्दीन , युनुस शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांद्रा मंडळाधिकारी प्रशांत पगार, ग्रामसेवक योगेश साठे यांनी काम पाहिले.
माहेजी (ता.पाचोरा) येथील नवनिर्वाचित सरपंच शोभाबाई पाटील यांचा सत्कार करतांना माजी सरपंच आबासाहेब पाटील, कैलास पाटील,नरेश पाटील, गौतम साळवे,यूनूस शेख,चांद बी शेख आदी.