मा.सौ वैशाली सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

मा.सौ वैशाली सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

गुढे: दि. 08/10/2023 रोजी येथे श्री गोपेश्वर महादेव सहकारी भाजीपाला व फळे उत्पादक खरेदी विक्री संस्था मर्यादित चा उद्घाटन सोहळा मा. श्री अण्णासो . एम. के. पाटील आणि शिवसेना नेत्या ताईसो. वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. या संस्थेचे उद्देश असे आहे की संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर भाजीपाला व फळझाडे यांचे लागवड करणे व उत्पादन कार्यक्रम अमलात आणणे, आपल्या संस्थेच्या अंतर्गत भाजीपाला व फळझाडे लागवडीकरिता यंत्रणा व साधन सामग्री उभी करणे, भाजीपाला व फळांची चांगल्या प्रकारे साठवणूक करणे त्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करणे, शीतकरणयुक्त गोदाम उभारणे तसेच यावर प्रतिबंधक औषधे, पावडर वगैरे फवारणे आदी. या उद्घाटन सोहळा प्रसंगी डॉ. उत्तमराव महाजन, उद्धवराव महाजन, भाऊराव अर्जुन माळी चेअरमन विकास सोसायटी, दिलीप देविदास पाटील, रघुनाथ हिलाल माळी, संजय सुधाकर पाटील, श्याम सर कोळगाव सह समस्त ग्रामस्थ मंडळी आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.