कॉ.विरेंद्रसिंग पाटील यांना विशेष गुणवंत कामगार पुरस्कार

कॉ.विरेंद्रसिंग पाटील यांना विशेष गुणवंत कामगार पुरस्कार

महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ कार्यालय पिंप्राळा जळगाव तर्फे विविध औद्योगिक आस्थापनेत कार्यरत असलेल्या कामगार कर्मचारी यांचे कामगार क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार वीज वितरण कंपनी चे कर्मचारी कॉ.विरेंद्रसिंग पाटील परिमंडळ सचिव तथा राज्य संयुक्त सचिव महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटना यांना जाहीर झाला असून त्यांच्या निवडीबद्दल दि.१ मे कामगार दिनाच्या तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त महावितरण जळगाव परिमंडळ कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री कैलास हुमणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी जळगाव परिमंडळ श्री अरूण शेलकर साहेब,अधिक्षक अभियंता श्री राजेन्द्र मार्के साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत , तसेच प्रमुख अतिथी कामगार कल्याण मंडळ अधिकारी श्री कुंदन खेडकर साहेब, कामगार कल्याण मंडळ पिंप्राळा केंद्र संचालक श्री नरेश पाटील साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कॉ.विरेंद्रसिंग पाटील यांच्या वीज कामगार क्षेत्रात कार्यरत असताना कामगार कर्मचारी यांचे प्रश्नांसोबतच वैयक्तिक पातळीवर तसेच वैद्यकीय उपचारासाठी येणारे अडचणी वर अखंड सेवा व्रती राहून सहकार्य करत आहेत.कोविड १९ च्या काळात स्वतःला कोरोना होण्याआधी आणि नंतर सुध्दा संबंधित असलेल्या रूग्णांना अत्यावश्यक असणारे सेवा,जसे की बेड उपलब्ध करून,प्लास्मा दान, रक्त दान, वैयक्तिक पातळीवर समुपदेशन करून मनोधैर्य वाढविणारे कार्य केले.तसेच संघटनात्मक कामकाज करत असताना कर्मचारी व प्रशासन यांच्या सुवर्ण मध्य साधणारी भुमिका महत्वाची आहे.अशा व्यक्तीला गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचे कॉ.जे.एन.बाविस्कर, कॉ.पी.वाय.पाटील,कॉ.देविदास सपकाळे,कॉ.प्रकाश कोळी, कॉ.अविनाश तायडे,कॉ.दिनेश बडगुजर,कॉ.श्रीमती संध्या पाटील,कॉ.भगवान सपकाळे,कॉ.जितेंद्र अस्वार यांनी अभिनंदन केले आहे.