राष्ट्रीय महिला दिनानिमित्त गो.से.हायस्कूलमध्ये महिला शिक्षक भगिनींच्या विविध स्पर्धा संपन्न

राष्ट्रीय महिला दिनानिमित्त गो.से.हायस्कूलमध्ये महिला शिक्षक भगिनींच्या विविध स्पर्धा संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी) पी टी सी संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे आज
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयात शिक्षिका भगिनी साठी संगीत खुर्ची, धावणे, बुद्धिमत्ता ,लिंबू चमचा ,निबंध स्पर्धा गायन स्पर्धा , स्मरणशक्ती स्पर्धा,अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांमध्ये नवचैतन्य व उत्साह दिसून आला गेल्या दोन वर्षापासून मैदानी स्पर्धा, पार पडल्या. या स्पर्धेनिमित्त महिलांमध्ये नवचैतन्य व आनंद दिसून आला खऱ्या अर्थाने महिलांना स्वातंत्र्य दिसून आले यासाठी शाळेतील सर्व शिक्षिका भगिनींनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेत टाळ्यांचा कडकडाट अभिनंदन केले शाळेतील सर्व शिक्षकांनी महिला भगिनींना सत्कार केला या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक .सुधीर पाटील ,उपमुख्याध्यापिका सौ.प्रमिला वाघ मॅडम पर्यवेक्षक .एन. आर. पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.