शासनाने दिलेला शब्द पाळला कोरोना काळात मृत्यू पावलेले नगरपालिका कर्मचारी यांना 50 लाखाचा धनादेश मिळाला

शासनाने दिलेला शब्द पाळला कोरोना काळात मृत्यू पावलेले नगरपालिका कर्मचारी यांना 50 लाखाचा धनादेश मिळाला

येथे कोरोना काळात नगरपालिका मुख्य अधिकारी सौ शोभा बाविस्कर मॅडम व त्यांचे सर्व नगरपालिका कर्मचारी स्टॉप रस्त्यावर उतरून सर्व नागरिकांना सूचना देत होते सर्व नागरिकांनी घरी थांबावे विनाकारण बाहेर फिरू नये अशी सूचना देत होते त्या काळात भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती कोरोना मुळे अनेक लोक मृत्यू पावत होते त्यावेळी आपली दिवटी बजावताना नगरपालिकेचे कर्मचारी यांचा मृत्यू झाले त्यावेळी त्यांना मदतीचा हात म्हणून त्यांच्या परिवाराला महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपालिका कर्मचारी मृत्यू झाल्याने नागरिकांना 50 लाखाची मदत जाहीर केली होती त्यानुसार पाचोरा नगरपालिकेचे जागृत मुख्याधिकारी सौ शोभा बाविस्कर मॅडम यांनी ताबडतोब आपल्या नगरपालिकेचे दोन कर्मचारी यांचा कोरोना काळात मृत्यू झाल्याचे सर्व कागदपत्र शासनाकडे रवाना केले त्यानुसार आज शासनाने पाचोरा नगरपालिका यांना 50 लाखाचा धनादेश दिला तो धनादेश मुख्य अधिकारी सौ शोभा बाविस्कर मॅडम यांनी त्यांच्या परीवाराला 50 लाखाचा धनादेश वाटप केला यामुळे शासनाने दिलेला शब्द पाळला पाचोरा
नगरपरिषद क्षेत्रातील कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडतांना कोरोनाची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी यांना सानुग्रह सहाय्य अनुदान देणेचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. पाचोरा नगरपरिषद आस्थापनेवरील मयत कर्मचारी कै.राजेंद्र देवचंद भिवसने, क्लिनर यांचे कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेत कर्तव्यावर असतांना कोव्हिड-19 चे संक्रमणामुळे मृत्यू झालेने तसेच कै.नरेंद्र युवराज अहीरे, समुदाय संघटक यांचे अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 चे संक्रमणामुळे मृत्यू झालेने त्यांचे पात्र वारसांना सानुग्रह सहाय्य अनुदान मिळणेकामी पाचोरा नगरपरिषदतर्फे शासनास प्रस्ताव सादर करणेत आलेला होता.
पाचोरा नगरपरिषदेतर्फे शासनाकडे पाठविलेले उक्त दोन्ही मयत कर्मचारी यांचे प्रस्ताव मंजुर झालेने प्रती मयत कर्मचारी र.रु.50 लक्ष मात्र याप्रमाणे एकूण र.रु.1 कोटी मात्र सानुग्रह सहाय्य अनुदान नगरपरिषदेस प्राप्त झालेले आहे. आज दि.14 एप्रिल 2022 महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी श्रीमती शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी तथा प्रशासक, पाचोरा नगरपरिषद यांचे दालनात श्रीमती शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचे हस्ते दोन्ही मयत कर्मचारी यांचे वारस नामे श्रीमती किरण राजेंद्र भिवसने व श्रीमती पंचशिला नरेंद्र अहीरे यांना प्रत्येकी र.रु.50 लक्ष मात्र सानुग्रह सहाय्य अनुदानाचे धनादेश वितरीत करणेत आले. श्रीमती शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी दोन्ही वारस श्रीमती किरण राजेंद्र भिवसने व श्रीमती पंचशिला नरेंद्र अहीरे याना सानुग्रह अनुदानाची रक्कम ही मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी पैशाचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे कुटूंबियांचे सात्वंन देखील केले. श्रीमती किरण राजेंद्र भिवसने व श्रीमती पंचशिला नरेंद्र अहीरे यांनी व त्यांच्या कुटूंबियांनी रक्कम रूपये 50 लक्ष मात्र सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले म्हणून मुख्याधिकारी मॅडम व तसेच नगरपरिषद पाचोरा प्रशासनाचे आभार मानले. तसेच सदर अनुदान प्राप्त होणे साठी श्री विशाल दिक्षीत, आस्थापना लिपीक यांनी सतत पाठपुरावा करून अनुदान मागणी साठी विशेष प्रयत्न केले म्हणून त्यांचे विशेष आभार मानले, सदर प्रसंगी उपमुख्याधिकारी श्री. डी.एस. मराठे, प्रशासकिय अधिकारी श्री. प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, तसेच पाचोरा नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.