पाचोऱ्यात अग्रवाल महिला मंडळातर्फे गण गौळण उत्साहात

पाचोऱ्यात अग्रवाल महिला मंडळातर्फे गण गौळण उत्साहात

पाचोरा, प्रतिनिधी !अनिल (आबा) येवले

पाचोऱ्यात अग्रवाल महिला मंडळातर्फे गण गौळणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या गण गौळण कार्यक्रमात परिसरातील महिलांनी ढोल ताशांच्या गजरात नृत साजर करत व फुगडी खेळत उत्सव साजरा केला. याप्रसंगी अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा निर्मला पटवारी, उपाध्यक्षा शीतल निमोदिया, सचिव इति मोर, कार्यकारिणी सदस्य रेखा मोर, बबीता मोर, दीपा अग्रवाल, किरण अग्रवाल, किरण पटवारी, कृष्णा गिंदोडीया, रीना भारतीया यांचेसह अग्रवाल महिला मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

पाचोरा शहरातील गांधी चौकातील चिमुकले शिव मंदिर येथे अग्रवाल महिला मंडळातर्फे गण गौळण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विधीवत पूजन करुन नृत साजर करत तसेच फुगडी खेळत उत्सव साजरा केला. यासोबतच चिमुकले शिव मंदिरा पासुन मिरवणूक काढण्यात आली. सदरची मिरवणूक गांधी चौक, सराफ बाजार, रथ गल्ली, रंगार गल्ली मार्गे मोर भवन पर्यंत काढण्यात आली. यावेळी पुष्पवृष्टी करत मंगलमय गीत गाण्यात आले.