श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील स्काऊट गाईड विभागामार्फत १ तारीख १तास स्वच्छता अभियान संपन्न

श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील स्काऊट गाईड विभागामार्फत १ तारीख १तास स्वच्छता अभियान संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी)
दि.1 ऑक्टोबर 2023 रोजी श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील स्काऊट व गाईड विभागामार्फत १ तास स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तसेच दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींच्या जयंती निमित्त या विभागामार्फत तंबाखू मुक्त शपथ शाळेत घेण्यात आली याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ , उप मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, पर्यवेक्षक आर. एल. पाटील सर, ए. बी. अहिरे , अंजली गोहिल,तसेच स्काऊट प्रमुख आर बी कोळी, उज्वल पाटील , गाईड प्रमुख सौ. एस. टी. पाटील ,सौ. श्रद्धा पवार व स्काऊट गाईड चे जवळपास 40 विद्यार्थी हजर होते.