ग्रामपंचायत गोेराडखेडा खुर्द सरपंचपदी संगीता पाटील बिनविरोध

ग्रामपंचायत गोेराडखेडा खुर्द सरपंचपदी संगीता पाटील बिनविरोध

गोराडखेडा खुर्द येथील प्रथम सरपंच विमलबाई धर्मराज पाटील यांनी नियोजित कालावधीनुसार सरपंचपदाचा एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर दि.३० रोजी सरपंचपदासाठी निवड जाहीर करण्यात आली. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र पाटील (मंडळ अधिकारी वरखेडी) यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी सौ संगीता रवींद्र पटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यानुसार निवडणूक अधिकारी महेंद्र पाटील यांनी दुपारी दोन वाजता संगीता पाटील यांना सरपंच पदी बिनविरोध घोषित केले. प्रसंगी माजी सरपंच तथा ग्राम. सदस्या विमलबाई धर्मराज पाटील कल्पनाबाई नाना पाटील, रवींद्र (मनोजआप्पा) उत्तमराव पाटील उपस्थित होते. प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी आबा पाटील, भरत पाटील, विश्वनाथ अहिरे यासह मित्रपरिवारातील गावातील मंडळी उपस्थित होती अनेकांनी नवनिर्वाचित सरपंच सौ. संगीता रविन्द्र पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.